राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार व एकनाथ शिंदे शपथ घेत असताना दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर लिटरप्रमाणे पाच रुपये अनुदान वर्ग होत होते.यामुळे एकीकडे शपथविधी तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाचा निधी,असा दुग्धशर्करा योग राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुभवायला मिळाला.

शेतकऱ्यांनी महायुती सरकारचे आभार मानत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना शपथ घेण्यासाठी शुभेच्छा दिल्या,तसेच खात्यावर दुधाचे अनुदान जमा झाल्यामुळे राहाता शहरात फटाक्याची जोरदार आतषबाजी करून एकमेकांना पेढे भरवले आणि मोठा जल्लोष साजरा केला.

राज्याचे महसूल व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेला शब्द पाळला आणि वचनपूर्ती करणारे कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांचा गौरव केला.त्यांना मनःपूर्वक धन्यवाद देत शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले.

महायुतीला सर्वाधिक जागा मिळवून देत जनतेने राज्यकर्त्यांना भरभरून मत दिले.राज्यकर्त्यांनी दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती करून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करून आर्थिक संकटं काही प्रमाणात कमी केली.

यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचा ठेवा होता.एकीकडे मुंबईत शपथविधी चालू असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन ते तीन महिन्यांची अनुदानाची रक्कम जमा होत होती.

दूधाच्या घसरलेल्या दरांबाबत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती.यावर लक्ष देत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अनुदान देण्याचा आश्वासन दिला होता. त्याचे प्रत्यक्ष फलित शपथविधीच्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले.

शपथविधीच्या आनंदात शेतकऱ्यांनी एकमेकांना पेढे भरले व फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद साजरा केला.राहात्यातील अनेक दूध उत्पादक शेतकऱ्यांनी हा आनंद व्यक्त करत माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे विशेष आभार मानले.तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांचेही आभार मानले.

दूध उत्पादक शेतकरी तुषार वाबळे, मिलिंद बनकर, सचिन बनकर, नितीन दंडवते, प्रज्वल सदाफळ, दत्तात्रय साबळे, गोरख नजन, गणेश नजन व अजय गिधाड यांनी अनुदान प्राप्त झाल्याबद्दल महायुती सरकारचे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

तुषार वाबळे म्हणाले, महायुतीचे शासन खऱ्या अर्थाने जनतेचे शासन आहे, आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे कैवारी आहेत. शेतकरी आणि दूध उत्पादकांसाठी नेहमीच मंत्री विखे पाटील यांचे खूप मोठे योगदान असते.

दुधाचे कमी झालेले दर व दूध उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावणारे प्रश्न सुटावे आणि त्यांना दिलासा मिळावा यासाठी त्यांनी प्रति लिटर पाच रुपये अनुदान दिले होते.याची प्रत्यक्ष वचनपूर्ती आज शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याने झाली आहे.शेतकऱ्यांप्रती या सरकारचे सहकार्य नेहमीच राहील, याचा विश्वास व्यक्त करत तुषार वाबळे यांनी मंत्री विखे पाटील यांना विशेष धन्यवाद दिले.