महाराष्ट्रात यावेळी विधानसभा निवडणुका नोव्हेंबर महिन्यात झाल्यामुळे या वर्षीच्या गाळप हंगामाला उशीर झाला आहे.या विधानसभा निवडणुकीत बहुतांशी साखर सम्राट उमेदवार म्हणून उभे होते.गाळप हंगाम उशिरा सुरु होण्यामागे हे एक कारण होते.
दोन आठवड्यापासून साखर कारखान्याच्या परिसरात बरेच उसतोडणी मजुर संसार थाटून बसले आहेत.पण अजूनही अहिल्यानगर जिल्ह्यात बऱ्याच साखर कारखान्यांनी गाळपाचा वेग धरलेला नाही.
मागच्या वर्षी जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून साखर कारखान्यांनी गाळप हंगामाला सुरुवात केली होती.मागच्या वर्षी २२ नोव्हेंबरला ९ लाख ७२ हजार मेट्रीक टन उसाचे गाळप झाले होते आणि त्यापासून ७ लाख १० हजार साखरचे पोते तयार झाले होते.
पण यावेळी इतका उशीर झाला कि आत्ताशी कारखान्याची चाक धडधडायला सुरूवात झाली आहे.त्यामुळे या वर्षी ऊस गाळप हंगाम सुरु व्हायला उशीर झाला आहे.
उसतोडणी कामगारांनी या वर्षी घरी बसून दिवाळीचा आनंद घेतला.ऊस तोडायला खूप कष्ट लागतात आणि खूप वेळ सुद्धा लागतो.पण आता बऱ्याच ठिकाणी मजुरांची जागा यंत्रांनी घेतली असून यंत्रांचा वापर वाढला आहे.
पण कारखान्यांना यंत्राची मदत घेतली नाही किंवा ज्यांना यंत्राची मदत घेणे परवडत नाही त्यांना ऊसतोडणी कामगारांचा तुटवड भासू लागला आहे.
त्यामुळे राष्ट्रीय व राज्य सहकारी साखर संघाने बऱ्याच साखर कारखान्याना हार्वेस्टर घेण्यासाठी अनुदान तत्त्वावर कर्ज योजना जाहीर केल्या आहेत.त्यामुळे ऊस उत्पादक सभासद शेतकरी आता हार्वेस्टरचे मालक झाले आहे.
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागातील ऊसतोडणी कामगारांची संख्या जास्त आहे.दिवसभर शेतात राबराब राबून मेहनतीने उसतोडुन हातात फक्त ६०० ते ८०० रूपये येतात.त्यामुळे मजुरांच्या शिकलेल्या पिढ्या उसतोडणीच्या कामाला जात नाही.
त्यामुळे खूपश्या साखर कारखान्यांना उसतोडणी मजुरांची कमतरता भासत आहे.याशिवाय मुकादम व तोडणी कामगारांना दिलेली उचल साखर कारखान्यांना वसुल करता येत नाही.त्यामुळे त्यांची कर्जाची बाकी वर्षानुवर्षे वाढत चालली आहे.
ज्या मुकादमांनी आणि उसतोडणी कामगारांनी ऊसतोडणीच्या कामासाठी लाखो रूपयांची उचल घेतली होती ते मुकादम किंवा मजूर दुसऱ्या राज्यात जाऊन त्याही कारखान्याकडून ऊसतोडणीचे पैसे घेतात.अशा मुकादम आणि ऊसतोडणी मजुरांना शोधने महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारांना दिवसेंदिवस अवघड होत आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातील कारखानदारांसमोर ऊस तोडणी कामगारांची कमतरता भासत आहे.त्यामुळे ते हंगाम सुरू व्हायच्या आधी पाचफुटी रूंद सरी पद्धतीने ऊस लागवडीचे मेळावे भरवून त्यादृष्टीने शेतकऱ्यांना लागवडीसाठी प्रोत्साहन देताना दिसत आहे.
अडचणीच्या ठिकाणी हर्वेस्टर चालत नाही.त्यासाठी ऊस तोडणी मजुरांचीच गरज लागते त्यामुळे उसतोडणी कामगारांना मागणी जास्त आहे पण त्यांची कमतरता सुद्धा भासत आहेत.
महाराष्ट्रात यावेळी १२ ते १३ लाख हेक्टर क्षेत्रावर उसाचे पीक आले असून यातून शाश्वत उत्पादन शेतकऱ्यांना मिळत आहे.एफआर पीचे सूत्र शेतकऱ्यांना फायद्याचे ठरले आहे.
२०० ते २२५ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम होईल,असा अंदाज आहे.त्यात ९५ ते १०० सहकारी साखर कारखाने आहे.बाकीचे खाजगी कारखाने आहेत. कमी दिवसात जास्त ऊस गाळप करणे हे आव्हान आहे.
पाऊस भरपूर झाला तर त्याचा फायदा साखर कारखान्यांना पुढच्या हंगामात होत असतो. यंदा इथेनॉल उत्पादनावर बहुतांश साखर कारखान्यांचा भर आहे.डिसेंबर ते मार्च पर्यंत उसतोडणीची घाई चालू राहणार आहे.