पावसाळा पूर्णपणे गेला आहे आता थंडीची चाहूल लागायला सुरुवात होत आह.डिसेम्बर महिन्यात थंडी अजून जास्त तीव्र होणार आहे.हिवाळ्यात आपल्या शरीराची आणि आरोग्याची जशी काळजी आपण घेतो तशीच काळजी आपल्या वाहनांचीही घ्यावी लागते.
आपल्या शरीराची आपण काळजी घेतली नाही तर जसा शरीरावर विपरित परिणाम होतो, तसाच परिणाम वाहनावरही होतो.त्यामुळे वाहनांची विशेष काळजी घ्यायला पाहिजे.
हिवाळ्यात तुम्ही तुमच्या कारची योग्य काळजी घेणं खूप गरजेचं आहे.थंडीची सुरुवात झाली आहे.काही ठिकाणी इतकी थंडी आहे कि त्या ठिकाणी धुक्याची समस्याही जाणवू लागली आहे.हिवाळ्यात कार चालू व्हायला अडचणी येतात.
गाडीचा अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे गाडीची चाके व टायर, त्यांची योग्य काळजी घेतली नाही किंवा टायर मधलया हवेचे प्रमाण योग्य नसेल तर अपघात होण्याची अधिक शक्यता निर्माण होते.
पावसाळ्यात पाण्यामुळे आणि हिवाळ्यात दवांमुळे रस्ते ओले होतात.अशा परिस्थितीत तुम्ही गाडी चालवताना टायर व्यवस्थित नसेल तर गाडी घसरण्याची किंवा सरकण्याची भीती असते.त्यामुळे वेळोवेळी हवा भरून घेणे, टायर बदली करून घेणे गरजेचे आहे.
हिवाळ्यात लवकर अंधार पडायला सुरुवात होते.त्यामुळे तुमच्या कारच्या हेडलाईट्सचा उजेड जास्त प्रखर असायला पाहिजे.त्यासाठी तुमच्या कारचे लाईट्स तपासून बघा.जर लाईट्सचा उजेड कमी वाटत असेल तर किंवा लाईट्स फ्लिकर होत असतील तर तुमच्या नेहमीच्या अथवा जवळच्या मेकॅनिक कडून दुरुस्त करून घ्या.
थंडी चालू होताच कार मधले सर्व पार्ट नीट आहेत की नाही, ते वेळोवेळी चेक करून घ्या.कारमध्ये कोणतीही समस्या असेल,तर तुम्हाला हिवाळ्यात लांबचा प्रवास अडचणिचा ठरू शकतो.कारची सर्व्हिसिंग आणि इतरही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या.
तुम्ही जर लांबच्या प्रवासाला जाणार असाल तर गाडीचे सगळे पार्टस नीट काम करीत आहेत की नाही ते तपासून घ्या मगच लांच्या प्रवासाला जा.काही गडबड वाटल्यास,मेकॅनिककडे जाऊन बॅटरी तपासून घ्या.
हिवाळ्यात किंवा थंडीच्या दिवसांमध्ये हलक्या घनतेच्या इंजिन ऑइलचा वापर करणे गरजेचे असते.त्यासाठी तुम्ही गाडीच्या मॅन्युअलमध्ये दिलेली माहिती आणि गाडी बनवणाऱ्या कंपनीने कोणत्या वातावरणासाठी, कोणत्या तापमानाचे इंजिन ऑइल, कूलंटचे प्रमाण दिले आहे ते वाचून, त्याप्रमाणे इंजिन ऑइल गाडीमध्ये टाकायाला पाहिजे.
कोणत्याही चारचाकी मधील सर्व यंत्रणा ही बॅटरीने चालत असते.जर बॅटरीची पॉवर कमी झाली तर बॅटरी उन्हाळ्यामध्ये त्रास देणार नाही;मात्र थंडीच्या दिवसांत अशी बॅटरी लवकर संपून जाण्याची किंवा खराब होण्याची शक्यता असते.
त्यामुळे हिवाळ्यात या दोन्ही गोष्टी नीट चालू आहेत ना हे तपासून पाहा.तुम्ही कर चालवताना, वेग नियंत्रित करण्यासाठी ब्रेक किती महत्त्वाचे असतात हे वेगळे सांगायला नको; मात्र ब्रेक्स सैल असतील, पटकन ब्रेक लागत नसतील, तर अपघात होण्याची शक्यता असते.त्यामुळे वेळोवेळी मेकॅनिककडे जाऊन ब्रेक्स दुरुस्त करून घ्या.
गाडी चालवताना समोरचे दृश्य आपल्याला स्पष्टपणे दिसावे यासाठी विंडशिल्ड आणि वायपर्स नीट चालू आहेत का ते बघून घ्या.पावसाळा असो किंवा हिवाळा, काचेवरील पाण्याचे थेंब, बर्फ, दव काढून टाकण्यास हे वायपर्स आपल्याला मदत करतात.
त्यामुळे विडशिल्ड आणि वायपर्स महत्त्वाचे असतात.म्हणून ते योग्य रीतीने काम करीत नसल्यास शक्य तितक्या लवकर दुरुस्त करून घ्यायाला पाहिजे.गाडीच्या काचांवर बाष्प जमू नये यासाठी गाडीमधील डीफ्रॉस्टर आणि क्लायमेट कंट्रोलची मदत होत असते.