जिल्हाधिकारी सिद्धाराम सलीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणूक – २०२४ मधील अहिल्यानगर जिल्हा स्वीप समितीद्वारे मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले होते.

या स्तुत्य उपक्रमांची भारत निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी-महाराष्ट्र, केंद्रीय संचार ब्युरो-भारत सरकार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र, विभागीय आयुक्त कार्यालय- नाशिक विभाग-नाशिक आदी राष्ट्रीय व राज्य पातळीवरील घटकांनी दखल घेतली.

जिल्हाधिकारी सालीमठ यांनी जिल्ह्यात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान व्हावे यासाठी घेतलेले विविध मतदान उपक्रम,विधानमंडप मतदारनगरी, ई- मतदार शपथ, व्ही. आर. बॉक्स, गुगल असिस्टंट,डिव्हाइस आदी तंत्रज्ञानाचा वापर, कडधान्यांच्या रांगोळ्या, तसेच भारत निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय आयकॉन व सिनेअभिनेते राजकुमार राव, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे (संगमनेर)

मराठी चित्रपट मालिका सृष्टीतील सिनेअभिनेते मिलिंद शिंदे, मोहिनीराज गटणे, प्रकाश धोत्रे (अहिल्यानगर) यांचे डी-व्हिडिओ संदेश, स्प्रेड-इट व नगर स्टोरीजचे मतदार जनजागृतीपर रील / व्हिडिओ, तालुकास्तरीय विविध स्वीप कक्षांचे उपक्रम यासह पोस्टर्स, जिंगल्स, छायाचित्रे, लोगो रिंगटोन आदी नाविन्यपूर्ण बाबी या विविध कार्यालयांच्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, वेबसाईट, युट्युब आदी माध्यमांवर शेअर करण्यात आल्या.

भारत निवडणूक आयोगाच्यावतीने प्रकाशित होणाऱ्या कॉफी टेबल बुक मध्ये यांतील नाविन्यपूर्ण, निवडक प्रभावशाली उपक्रमांचा समावेश होणार आहे.

नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील, स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी अशोक कडूस अध्यक्ष मतदार जागृती मंच तथा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, बाळासाहेब बुगे (शिक्षणाधिकारी), मीना शिवगुंड (उपशिक्षणाधिकारी), आकाश दरेकर (उपशिक्षणाधिकारी), जयश्री कारले (विस्तार अधिकारी) डॉ. अमोल बागुल (जिल्हा मतदारदूत) व सर्व स्वीप समिती सदस्य आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.