राज्याला हादरवणारी ‘ती’ घटना १३ जुलै २०१६ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे घडली होती.त्याला आठ वर्ष झाल्यानंतरही अद्याप शाळेमध्ये जाणाऱ्या या गावातील मुलीबाबत ‘भय इथले संपत नाही.’ गावामध्ये फक्त इयत्ता सातवीपर्यंत शाळा आहे.

‘त्या’ घटनेनंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ग्रामस्थांनी व विद्यार्थिनींनी गावातच इयत्ता बारावीपर्यंत शाळा असावी अशी मागणी केली होती.आजही ती मागणी पूर्ण झालेली नाही.

त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंदाच्या विधिमंडळाच्या पहिल्या अधिवेशनातच कोपर्डी गावासाठी पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळेला मान्यता द्यावी, अशी मागणी कोषडी ग्रामस्थांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

मराठा क्रांती मोवचि राज्याचे समन्वयक प्रा. तात्यासाहेब सुद्रिक, गावचे सरपंच शांतीलाल सुद्रिक, उपसरपंच राहुल सुदिक, चेअरमन लालासाहेब सुद्रिक, ग्रामपंचागत सदस्य सुनील सुद्रिक, संजय सुद्रिक, विष्णु सुद्रिक, सुरेश सुद्रिक, रूपचंद्र मुद्रिक, तात्या सूर्यवंशी, वाल्मीक सूर्यवंशी व हनुमंत सुद्रिक आदी या वेळी उपस्थित होते.

या वेळी बोलताना प्रा.तात्यासाहेब सुद्रिक म्हणाले,की काल पीडित कुटुंबीयाच्या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःउपस्थित राहिले.त्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो.मात्र आठ वर्षांपूर्वी ग्रामस्थांच्या वतीने च शिक्षण घेणाऱ्या गावातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनीच्या सतीने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गावामध्ये शिक्षणासाठी पाचवी ते बारावी अशी शाळा असावी व याला मान्यता द्यावी, अशी मागणी केली होती.

या गावातील १५० विद्यार्थी प्राथमिक शाळेत व २५० विद्यार्थी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत.मात्र आजही सर्व विद्यार्थ्यांना गावांमध्ये शाळा सात पर्यतच असल्यामुळे पुढील शिक्षणासाठी कर्वत येथे किंवा अन्यत्र जाये लागते.

त्या वेळी भय्यूजी महाराजांच्या माध्यमातून सन २०१६ या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावामध्येच शाळा मान्यता व बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. तो प्रश्न आजही प्रलंबित आहे.त्या आश्वासनाची पूर्तता करावी व गावामध्ये पहिली ते बारावी अनुदानित शाळेला मान्यता पहिल्याच अधिवेशनात द्यावी.शाळा व इमारतीसाठी लगेच मंजुरी देण्यात यावी.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे बास्तठी राज्यामध्ये त्या वेळी ५८ मोर्चे काढण्यात आले.राज्यात व देशामध्ये तुमचे सरकार आहे, त्यामुळे मराठा साम्राज्याला न्यायालयामध्ये टिकणारे आरक्षण देण्यात यावे.ज्यांच्या कुणबीच्या नोंदी आहेत, त्यांना तात्काळ दाखले देण्यात यावेत जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत ‘इंडब्ल्यूएस मधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात वाये.

याशिवाग सारथीच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षणासाठी निधी कमी मिळत आहे.अण्णासाहेब पाटील व्यर्थिक विकास महामंडळातर्फे फक्त दहा लाख रुपये निधी देण्यात येतो,त्यामधून मराठा समाजाला कोणताही व्यवसाय पुरेसा उभा करता येत नाही, तरी अनुदान तत्काळ वाढवण्यात यावे.

शिक्षणामध्ये सर्व मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसी सवलत देण्यात यावी.याचप्रमाणे ओबीसींची शिष्यवृत्तीदेखील लागू केलेली नाही, ती तत्काळ मिळावी. सर्व जिल्ह्यांमध्ये मराठा समाजातील विद्याथ्यांसाठी वसतिगृह बांधून देण्यात यावे, अशा मागण्याही या केळी करण्यात आल्या.

रस्त्याचा प्रश्न होता. त्या ठिकाणी नांदगाव खोपडी रस्त्याला निधी मिळालेला नाही.तो रस्ता प्रलंबित आहे, असे सांगून सुद्रिक म्हणाले, की कोपर्डीसाठी रस्ता, शाळा आणि आरोग्य केंद्राची मागणी केलेली होती. महिलांसाठी आरोग्य केंद्राचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

त्यावर एक कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे; परंतु एवढी मोठी दिमाखात असणारी इमारत डॉक्टर नसल्याने किंवा योग्य सोयी उपलब्ध नसल्याने धूळ खात पडलेली आहे. त्यासाठी आवश्यक फर्निचर आणि डॉक्टर देण्याची व्यवस्था मुख्यमंत्र्यांनी तातडीने करावी.