काही दिवसांपूर्वी राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत होते.सर्व पक्षांच्या नेत्यांसह उमेदवार आणि कार्यकर्त्यांची आपापल्या पक्षाच्या प्रचारासाठी धावपळ चालू होती.काल दिवभर राज्यात निवडणूका शांततेत पार पडल्या.
जिल्ह्यात देखील मतदानाचा टक्का उत्तम होता.बुधवारी (दि.२० रोजी) झालेल्या मतदानाच्या दिवशी मतदारांनी मतदानाला दुपार नंतर उत्स्पूर्त प्रतिसाद देत स्वयंस्पुर्तीने मतदान करत असल्याचे चित्र दिसत होते.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी श्रीगोंदा मतदार संघात संध्याकाळी पाच वाजे पर्यंत ५५.४९ टक्के मतदान होऊन १ लाख ८८ हजार ३९४ मतदारांनी मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.
श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात एकूण ३ लाख ३९ हजार ५२६ मतदार असून यामध्ये १ लाख ७६ हजार ३६५ पुरुष तर १ लाख ६३ हजार १५९ महिला मतदार आहेत.
संध्याकाळी पाच वाजल्यानंतर श्रीगोंदा शहरासह नगर, श्रीगोंदा तालुक्यातील काही गावातील मतदान केंद्रावर उशिरापर्यंत मतदान सुरू होते. मागील १५ दिवसापासून प्रचाराच्या सुरू असलेल्या रणधुमाळी चुरशीचे वातावरण राहिले होते.
आज श्रीगोंदा मतदार संघातल्या १६ उमेदवारांचे भविष्य ईव्हीएम मशीन मध्ये बंद झाले आहे.आमदार बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव विक्रम पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, जिल्हा बँक संचालिका अनुराधा नागवडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार यांच्यात अटीतटीची लढत झाल्याचे दिसून येत होते.
संध्याकाळी पाच वाजेपर्यंत १ लाख ८८ हजार ३९४ मतदारांपैकी ९७ हजार ९९९ पुरुष तर ९० हजार ३९५ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला.संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ५५.४९ टक्के मतदान पूर्ण झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गौरी सावंत यांनी दिली.
मतदानाला सुरुवात झाल्यापासूनच संथगतीने मतदान सुरू होते.मतदान केंद्रावर सकाळी जास्त गर्दी नसल्यामुळे सकाळी अकरा वाजे पर्यंत तालुक्यात फक्त २० टक्याच्या आत मतदान झाले होते.
पण मात्र दुपारी तीन नंतर मतदानाचा जोर वाढून मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांच्या रांगा लागून गर्दीत वाढ होत होती.पाच वाजेपर्यंत ५५.४८ टक्के मतदान होऊन श्रीगोंदा शहरासह नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील काही गावातील मतदान केंद्रावर रात्री उशिरा पर्यंत मतदान सुरू होते.
दिवसभरात किरकोळ अनुचित प्रकार घडता मतदान रात्री उशिरापर्यंत शांततेत पार पडले असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गौरी सावंत यांनी दिली.