गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणाने गारठलेला नगरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.रात्रीच्या तापमानात मंगळवारी काही अंशाने वाढ झाली होऊन २० अंशांवर पोहोचले आहे, जे सरासरीपेक्षा तब्बल ७.८ अंशाने अधिक आहे. त्यामुळे नगरकरांच्या अंगावरचे स्वेटर दूर झाले आहे; परंतु दिवसा पारा सरासरीत असल्याने थोड्या प्रमाणात गारव्याची जाणीव होत आहे.
जिल्ह्यात मंगळवारी काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. हवामान विभागाने पुढील तीन-चार दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला असून याचा फटका कांदा, कापूस आणि तुरीला बसण्याची शक्यता आहे.
फॅगल चक्रीवादळ पुडुचेरीमध्ये शांत झाले असताना कर्नाटक किनारपट्टीवर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.मंगळवारी मध्य अरबी सागरात सरकला आहे.यासोबत तयार झालेले सायक्लोनिक सर्क्युलेशन पुढच्या दोन दिवसांत मध्य पूर्व अरबी समुद्रात तयार होण्याचा अंदाज आहे.
या प्रभावाने महाराष्ट्रात पुन्हा तीन दिवस ढगाळ वातावरण राहून उसळलेले तापमान कायम राहण्याची शक्यता आहे.दरम्यान, ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानाने चांगलीच उसळली घेतली आहे.अहिल्यानगरशिवाय पुणे, नाशिकमध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे.
अहिल्यानगरमध्ये मंगळवारी किमान तापमान २० अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे आणि कमाल तापमान २५ डिग्री सेल्सियसच्या आसपास होते.हवामान अंदाजानुसार आठवड्यातील वेगवेगळ्या दिवशी तापमान मंगळवारी २० अंश सेल्सिअस, बुधवारी २१ अंश सेल्सिअस, गुरुवारी २१ अंश सेल्सिअस, शुक्रवारी २३ अंश सेल्सिअस, शनिवारी २१ अंश सेल्सिअस राहील.रविवारी १९ अंश सेल्सिअस आणि सोमवारी १८ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.