श्रीगोंद्यात वनविभाच्या झोपेच्या सोंगाने आतापर्यंत शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असून याबाबत वनविभाग कोणत्याही प्रकारची ठोस पाऊले उचलत नसल्यामुळे शेतकऱ्याच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आमदार विक्रम पाचपुते यांनी हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न केल्यावर वनविभागाला खडबडून जाग आली असून वनविभाग कामाला लागल्याचे बोलले जात आहे.

आज पर्यन्त श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतातील पिकांचे नुकसान तसेच पशुधनावर मोठ्या प्रमाणात बिबट्याचे हल्ले होऊन शेळी मेंढ्या गाई वासरे यासह अनेक जनावरे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडली आहेत.घटना घडल्यावर वनविभाग दाखवण्यापुरती तत्परता दाखवून पंचनामा करतात मात्र त्याचे पुढे काय होते हे कोणत्याही शेतकऱ्याला आजपर्यंत समजले नाही.

पशुधनावर हल्ला झाल्यावर सुरवातीला अधिकाऱ्यांना संपर्क केल्यावर त्यांचा फोन बंद असतो अथवा ते बाहेरगावी असतात त्यामुळे त्यांच्याशी संपर्क होतच नाही आणि संपर्क झाला तर त्या सांगतात कि आमचे अधिकारी येतील आणि पंचनामा करतील.त्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी बिबट पकडण्यासाठी शेतात पिंजरे लावण्याची हजारो वेळा मागणी केली मात्र त्याचा वनविभागाने कधीच विचार केला नाही.उलट पिंजरा लावण्यास सांगणाऱ्या शेतकऱ्याबरोबर महिला अरेरावी करत असल्याच्या अनेक घटना ताज्या आहेत.

या सर्व प्रकारची माहिती श्रीगोंदा तालुक्याचे आमदार विक्रम पाचपुते यांना शेतकऱ्यांनी दिल्यावर त्यांनी याबाबत विधानसभेत तारांकित प्रश्न निर्माण करून उत्तर मागविले आहे,त्यामध्ये बोलताना त्यांनी सांगितले कि आजपर्यंत शेती पशुधनावर हल्ले व्हायचे ते आता मनुष्यावर होत आहे.शेतकरी शेतीवर पाणी देण्यासाठी रात्री जातोय,हल्ले रोखण्यासाठी शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यावी तसेच बिबट पकडण्यासाठी पिंजरे लावावेत असा तारांकित प्रश्न केल्यावर प्रशासनाची चांगलीच धांदल उडाल्याचे बोलले जात आहे.

याबाबत तालुक्याच्या वनाधिकारी याच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचे प्रकार अनेकदा घडले असल्यामुळे श्रीगोंद्यातील वनविभागाचा बिबट्याचा विधानसभेत तारांकित प्रश्न, तरीही वनविभाग झोपेतच ? असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.

शेतातील पिकांसह शेतकऱ्याच्या पशुधनासह शेकऱ्यावर हल्ले होऊन जखमी शेकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,त्याचे वनविभागाने पंचनामे केले आहेत,पण अद्यापही अनेकांना नुकसान भरपाई मिळालेली नाही.त्यामुळे आजपर्यंत वनविभागाने कागदी घोडे नाचविण्या शिवाय काहीही केले नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.