गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत ज्या ज्या गावांमध्ये ५० टक्यांपेक्षा कमी मतदान झाले त्या त्या मतदान केंद्रावरील मतदान वाढावे यासाठी स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत.

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात ७५ टक्के मतदान होण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असून त्याचाच एक भाग म्हणून सर्वाधिक मतदान होणाऱ्या गावाचा आणि मतदारसंघाचा लोकशाही चषक देऊन सन्मान केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी गेल्या लोकसभा निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रावरील मतदान वाढविण्यासाठी मतदारांच्या भेटी घेऊन त्यांना मतदानाचे आवाहन केले जात आहे.

त्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत प्रभातफेरीच्या माध्यमातूनही मतदारांपर्यंत मतदानाबाबदल जागृती करण्याचे काम केले जात आहे.

गावपातळीवर मतदान वाढवण्यासाठी जे प्रयत्न केले जात आहेत त्या प्रयत्नांना प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी चांगले काम करणाऱ्या गावांना चषक देऊन सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे.

गावातील तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, पोलीस पाटील, कृषी सेवक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती आदींनी मतदारांपर्यंत जाऊन मतदान करण्याचे आवाहन करावे.

मतदारांना मतदान करणे सोपे होण्यासाठी तशी व्यवस्था मतदान केंद्रावर करावी. मतदारांच्या स्वागतासाठी विशेष कल्पना राबवाव्यात, असे आवाहनही सालीमठ यांनी केले आहे.

मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे हे पटवुन देऊन शहरी लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले जावे.म्हणून यासाठी विविध सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे सहकार्य घ्यावे आणि मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राची माहिती द्यावी.

मतदान करताना केंद्रावर तणाव पूर्वक वातावरण न राहता अल्हाददायी वातावरण राहण्यासाठी आणि मतदारांना जास्त वेळ रांगेत उभे राहू लागू नये.

यासाठी गरजेच्या त्या सुविधा निर्माण कराव्यात.अशा विविध उपाययोजनांचा वापर करून मतदारांना प्रोत्साहीत करावे,असे निर्देश ही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि मतदान केल्यामुळे आपण गावाचा विकास करणारा योग्य प्रतिनिधी निवडू शकतो.निवडणुकीत मतदान केल्यामुळे लोकशाही बळकट करता येते म्हणून निवडणुकीत मतदानाला महत्व आहे.

सुलभ मतदानासाठी प्रशासनाने मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणऱ्याही प्रलोभनाला बळी पडू नये आणि निर्भयपणे मतदान करावे आणि जिल्ह्यात ७५ टक्के मतदानाचे उद्दीष्ट गाठण्यास सहकार्य करावे,असे आवाहनही जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी मतदारांना यावेळी केले आहे.