काल राज्यभर विधानसभा निवडणूक शांत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या.अकोले मतदार संघात देखील मतदान व्यवस्थितरित्या पार पडले.हा मतदार संघ आदिवासी भागासाठी राखीव मतदार संघ आहे.
सध्या आदिवासी भागात भात काढणी सुरू असल्यामुळे त्याचा परिणाम मतदानावर होईल, अशी शंका होती; परंतु आदिवासी भागात मतदारांमध्ये उत्साह बघायला मिळाला असुन मागील गत विधानसभा निवडणुकी पेक्षा जास्त मतदान यावेळी यावेळी झाले आहे.
मागच्या विधानसभा निवडणुकीत ६९ टक्के मतदान झाले होते.परंतु या विधानसभा निवडणुकीत ७१ टक्के मतदान झाले आहे.अकोले विधानसभा मतदारसंघात एकूण ३०७ मतदान केंद्रं असून मतदारसंघात सुमारे ७१ टक्के इतके मतदान झाले.
काल मतदानाच्या दिवशी सगळ्या मतदान केंद्रावर मतदान शांततेत आणि उत्सहात पार पडले.या मतदार संघातील ९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून या मतदार संघात कोणाचा विजय होईल हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.
अकोले विधानसभा मतदारसंघात ९ उमेदवार निवडणूक लढवीत असून या मतदार संघात एकूण २ लाख ६६ हजार १२९ इतके मतदार आहेत.यामध्ये १ लाख ३८ हजार ८४५ पुरूष मतदार आहेत. १ लाख २७ हजार २८३ स्त्री मतदार आहेत.तर १ तृतीयपंथीय मतदार आहे.
सेनादलातील ५३० मतदार आहेत. मतदानाच्या दिवशी पहाटे साडेपाच वाजता सर्व उमेदवारांनी नियुक्त केलेल्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मॉक पोलची प्रक्रिया पूर्ण झाली.त्यानंतर सकाळी ७ वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली.
मतदान प्रक्रियेत मतदारांना सहकार्य व्हावे म्हणून प्रत्येक मतदान केंद्रावर बीएलओची नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी व्हिलचेअरची सुविधा करण्यात आली होती.वेटींग रुम, पिण्याच्या पाण्याची सुविधा, विद्युत पुरवठा आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या.
अकोले विधानसभा मतदारसंघात ३०७ मतदान केंद्रावर १५३५ अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सिद्धार्थ मोरे, गटविकास अधिकारी विकास चौरे, निवासी नायब तहसीलदार किसन लोहारे, महसूल नायब तहसीलदार प्रमोद सावंत, निवडणूक नायब तहसीलदार दत्तू वाघ, नायब तहसीलदार मार्तंड माळवे, पुरवठा निरीक्षण अधिकारी संदीप निळे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान शांततेत पार पडले.
मतदान केंद्रांवरील सुरक्षाकामी सुमारे ३०४ पोलीस कर्मचारी व २८७ गृह रक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा व्यवस्थेकामी नियुक्ती करण्यात आली होती. अकोले विधानसभेतील प्रत्येक बुथवर गरजेनुसार २ सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती तर ११ भरारी पथकांच्या माध्यमांतून पेट्रोलिंग सुरू होती.