नेवासा मतदारसंघातील मतदानयंत्रे बुधवारी (दि. २१) रात्री उशिरापर्यंत नेवासा फाटा येथे असलेल्या शासकीय धान्य गोदामधील स्ट्रॉगरूम मध्ये पोहचवलया आहेत.मतदान यंत्र आणि साहित्यांची मोजणी करून सर्व साहित्य स्ट्राँगरूम पहाटे सील केली.हि सुरक्षा उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी केली जात असून मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

या स्ट्राँगरूमच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यावर असून हि सुरक्षा तीन लेयरमध्ये विभागली आहे.पहिलया लेयरमध्ये स्ट्राँगरूम जवळ केंद्रीय राखीव पोलिस दलाची एक प्लाटून म्हणजे ३० जवान २४ तास सुरक्षेसाठी तैनात केले आहेत.

स्ट्राँग रूमच्या सुरक्षेच्या दुसऱ्या लेअरमध्ये गुजरात राज्य राखीव पोलिस दलाची एक प्लाटून २४ तास तैनात केली आहे आणि तिसऱ्या लेयरमध्ये जिल्हा पोलिस दलाकडील अधिकारी व अंमलदार नियुक्ती केलेले आहेत.

एवढेच नव्हे तर स्ट्राँगरूमच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून त्याचे २४ तास निरीक्षण करण्यात येत आहे.सामान्य नागरिकांना स्ट्राँगरूम पासून २०० मीटर परिसरामध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

स्ट्रॉंगरूममध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात पुरेशा विद्युत प्रकाशासाठी जनरेटरची व्यवस्था करण्यात आली असून या सर्व यंत्रणेवर व सर्व सुरक्षेवर निवडणूक निर्णय अधिकारी अरूण उंडे व सहायक तहसीलदार डॉ. संजय बिरादार लक्ष ठेवून आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांद्वारे प्रत्येक तासाला स्ट्राँगरूमला भेट देऊन सुरक्षेची पाहणी केली जात आहे.या भेटीच्या आणि पाहणीच्या सविस्तर नोंदी रजिस्टरला ठेवल्या जात आहेत.

शनिवारी मतमोजणी होणार आहे त्यामुळे कडक सुरक्षा ठेवली असून,स्ट्रॉगरूममध्ये जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मेटल डिटेक्टरच्या साह्याने तपासणी करूनच आत सोडण्यात येणार आहे.

बुधवारी आणि गुरूवारी निवडणूक निरीक्षक तसेच मतमोजणी निरीक्षकांनी या स्ट्रॉंगरूमला भेटी देऊन मतमोजणीच्या तयारीचा आढावा घेतला.तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांनी देखील भेट देऊन बंदोबस्ताची पाहणी केली आहे.

शनिवारी होणाऱ्या मतमोजणीच्या वेळेस केल्या जाणाऱ्या बंदोबस्तसाठी गुरूवारी पाहणी करून आखणी करण्यात आली आहे.एकूण २० फेऱ्यांमध्ये हि मतमोजणी होणार असून,प्रत्येक फेरीच्या घोषणेसाठी लाऊड स्पिकरची व्यवस्था करण्यात आली आहे.

तसेच त्या दिवशीच्या सुरक्षेसाठी एक पोलिस उपअधीक्षक, ३ पोलिस निरीक्षक, १० सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक व १०० जवानांचा ताफा, स्ट्रायकींग फोर्स, दंगा नियंत्रण पथके तैनात करण्यात येणार आहेत.