तालुक्याच्या शहरी भागासह ग्रामीण भागातील सर्वच परिसरात अल्पवयीन वाहन चालक सुसाट वाहने चालवत असून, दिवसेंदिवस अल्पवयीन वाहनचालकांची संख्या वाढत आहे.त्यामुळे अपघातांच्या घटनेमध्ये वाढ होत आहे.

यामध्ये पालक बेफिकीर असल्याचे दिसत आहे म्हणून याला आळा घालण्यासाठी पोलिस व महाविद्यालयांनी प्रबोधन करण्याची गरज आहे.श्रीगोंदा शहरात अल्पवयीन चालक आणि त्यातून होणारे अपघात याचे प्रमाण वाढत चालले असून त्यामुळे अपघाताची संख्या वाढत चालली आहे.

शहरात मुलें नाही तर अल्पवयीन मुलीसुद्धा ट्रिपल सीट सर्रासपणे दुचाकी वाहने चालवत आहेत.अनेक अल्पवयीन मुली व मुलांना वाहन चालविता येत नाही. तरीही ते भरधाव वेगाने वाहन चालवत असतात.आपण शंभरच्या स्पीडने वाहन चालवू शकतो,असे अभिमानाने ते सांगतात.

त्याचबरोबर कर्कश हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषण करतात.त्यातील अनेक जण वाहतुकीचे नियम पाळत नाहीत.वाहन चालवण्यासाठी अठरा वर्षे पूर्ण झाल्याशिवाय परवाना मिळत नाही.परवाना नसतानाही वाहन चालवणे हा कायद्याने गुन्हा आहे.

हा नियम पालकांना माहिती असूनही अनेकदा मुलांच्या हाती पालक स्वतःच वाहन देतात.त्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.त्यामुळे वाहन चालविणाऱ्या अल्पवयीन मुले आणि त्यांच्या पालकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

अनेक पालक आपल्या अल्पवयीन मुलाच्या हाती दुचाकी देतात.तर, काही मुले दुचाकीचा आग्रह धरतात.यातूनच अल्पवयीन दुचाकी चालवणाऱ्यांची संख्या वाढत आहे.तर, काही कुटुंबातील मुलांच्या हाती अनेकदा चारचाकी वाहनेही पाहायला मिळतात.

एक प्रकारे पालक वाहन चालवायला प्रोत्साहन देत असल्यामुळे अपघातामध्ये वाढ झाली आहे.अशा अल्पवयीन मुलांवर कारवाई करण्यापेक्षा पालकांवर पोलिस प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

कर्ण कर्कश हॉर्न आणि सायलन्सर ने नागरिक त्रस्त दुचाकी चालवताना अल्पवयीन मुलांच्या गाडीला मोठे मोठे कर्ण कर्कश हॉर्न तसेच बनवलेले सायलन्सर चे फटाके मोठ्या आवाजात वाजविल्याने मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषणात वाढ होऊन नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने पोलिसांनी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.