पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसी मधील जांभूळवाडी वस्तीवर जुन्या औद्योगिक वसाहतीमधे आयुष आग्रवाल यांची व्हिजी कार्बन कंपनी असुन, या कंपनीला गुरुवार दि. २६ डिसेंबर रोजी, सकाळी लागलेल्या भिषण आगीमधे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

कंपनीमधे टायरपासुन ऑईल तयार होते आज अचानक लागलेल्या आगीमुळे कंपनी परीसरात धुराचे लोट वाहत होते. कंपनी मधील लाखो रुपयांचे टायर जळून खाक झाले आहेत.सकाळ पासुन लागलेल्या या आगीमुळे परीसरात प्रचंड घबराट पसरली होती.

सुदैवाने कुठलीही मनुष्यहानी झाली नाही.मात्र फायर ऑडीट होत नसल्याने कंपनीतील कामगारांची सुरक्षितता राम भरोसे असल्याची माहीती मनसे नेते अविनाश पवार यांनी दिली.

पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीशीमधे व्हिजी कार्बन कंपनीला लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचे टायर जळून भस्मसात झाले.सुपा पारनेर रस्त्यालगत जांभूळवाडी वस्तीवरील जुन्या औद्योगिक वसाहतीमध्ये आयुश अग्रवाल यांची व्हिजी कार्बन कंपनी आहे.

या कंपनीत टायरपासून ऑईल तयार केले जाते.विस्ताराने मोठ्या असलेल्या या कंपनीत गुरुवार दि. २६ डिसेंबर रोजी पहाटे अचानक आग लागली.कंपनीत टायर असल्याने बघता बघता या आगीने रौद्ररुप धारण केले होते.त्यामुळे कंपनी परिसरामधे धूराचे मोठे लोटच्या लोट तयार झाले दिसत होते.

या लागलेल्या आगीमधे लाखो रूपयांचे टायर जळून खाक झाल्याचे समजते.घटनेची माहिती समजताच सुपा पोलिस स्टेशनचे निरीक्षक अरुण आव्हाड आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

अहमदनगर येथुन बोलावलेल्या अग्निशमन दलाच्या गाड्या बोलाविल्या होत्या मात्र, गाड्या येण्यास वेळ लागल्याने आगीचे प्रमाण वाढतच गेले.नंतर अहमदनगर येथून अग्निशमनच्या दलाच्या गाड्या दाखल झाल्या.

त्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली.आज सकाळपासूनच औद्योगिक वसाहतीमध्ये धूराचे लोट दिसत असल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. सुपा औद्योगिक वसाहती मधील कामगारांची सुरक्षिता रामभरोसे सुपा एमआयडीसी मधील कंपन्यांनी कामगारांच्या सुरक्षिततेसाठी फायर ऑडीट करणे गरजेचं आहे.

फायर ऑडीट होत नसल्याने येथील कामगारांची सुरक्षिता रामभरोसे आहे.याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लवकरच आवाज उठवणार आहे असे मनसेचे नेते अविनाश पवार यांनी सांगितले आहे.