राजकीय वादातून तरुणांमध्ये मारामारी करण्याचे प्रमाण वाढले आहेत.आजची तरुण पिढी राजकारणाच्या अति आहारी जात असल्यामुळे तरुणांचे भविष्य धोक्यात येऊ लागले आहे.
आजचे युवक राज्यकर्त्यांच्या एवढे आहारी जातात कि त्यांना कशाचेच भान राहत नाही आणि स्वतःचे पुढचे आयुष्य खराब करून घेतात.
नगर शहरातून एक घटना समोर आहे ज्यात एका तरुणाला पाच सहा जणांनी मारहाण करत तरुणाला तिघांनी बेदम मारहाण करत करून जखमी केले आहे.जखमी तरुणावर उपचार चालू आहेत.फिर्यादी तरुणाने या सहा जणांविरुद्ध तक्रार नोंदविली आहे.
ओंकार शेळके (रा. काटवन खंडोबा) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव असून त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि,फिर्यादी तरुण हा कोतवाली पोलिस स्टेशनच्या मागील बाजूच्या गल्लीत मेडिकल दुकानात कामाला असून तो काम करत असताना तेथे दुपारी ५ जण आले त्यातील तिघांनी त्याला नेत्याचे फोटो स्टेटस ठेवल्यावरून त्यास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
तसेच जाताना तू जर आमची पोलिसांकडे तक्रार केली तुझ्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू, तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली असल्याचे जखमी ओंकार याने सांगितले.
ओंकार याने आपल्या स्टेटसला राजकीय नेत्याचे फोटो टाकले होते याचाच राग येऊन टोळक्याने ओंकार याला दमदाटी करून मारहाण केली आणि अट्रोसिटीची धमकी दिली.
मारहाणीत जखमी झालेल्या शेळके यास उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्याची विविध नेत्यांनी भेट घेत त्याच्या प्रकृतीबाबत चौकशी केली.
दरम्यान जखमी शेळके याच्या तोंडाला मार लागलेला असल्याने त्याला बोलताना त्रास होत असल्याने रात्री उशिरापर्यत त्याचा जबाब घेण्याचे काम सुरू होते.