Ahilyanagar Weather Update : उद्या महाराष्ट्रातील काही भागांमध्ये उष्णतेचा कहर दिसून येत आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांमधील तापमान 42°c पर्यंत पोहोचले आहे. काही ठिकाणी तापमान 43 अंश सेल्सिअस पर्यंत गेले आहे. उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव येथे दिवसाचे कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस पर्यंत नमूद केले जात आहे. यामुळे मात्र सर्वसामान्य नागरिक उकाड्याने घामाघुम झाले आहेत.
अंगाची अक्षरशा लाहीलाही होत आहे. यामुळे वाढत्या तापमानाने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. दुसरीकडे राज्यातील काही भागांमध्ये गेल्या नऊ ते दहा दिवसांपासून वादळी पावसाचे सत्र सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात गारपिट झाल्याची नोंद करण्यात आली.
विशेष म्हणजे काल देखील कोल्हापूरमध्ये वादळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली. अशातच भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा एक नवीन हवामान अंदाज जारी केला असून आगामी 3 तासात राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आगामी काही दिवस अवकाळी पावसाचे सत्र असेच सुरू राहणार आहे.
आयएमडीने मंगळवार पर्यंत महाराष्ट्रात वादळी पाऊस सुरू राहणार असा अंदाज नुकताच जारी केला आहे. यानुसार सध्या मराठवाडा आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली असल्याचे चित्र आहे. त्यापासून कर्नाटक, दक्षिण तमिळनाडूपर्यंत वाऱ्यांचे प्रवाह खंडित होत आहेत अन यामुळे कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे.
दरम्यान, हवामानात झालेल्या या परिवर्तनामुळे सध्या महाराष्ट्रात वादळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने यावेळी जारी केला आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढत आहे. एक तर आधीच नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता पुन्हा एकदा हा वळवाचा पाऊस शेतकऱ्यांचे नुकसान करू पाहत आहे.
IMD ने आज अर्थातच 20 एप्रिल 2024 ला राज्यातील मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, सांगली या जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे.
शिवाय आज विदर्भ आणि मराठवाड्यात देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळू शकते. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड आणि विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत वादळी वारे अन विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
यामुळे या सदर भागातील शेतकऱ्यांना अधिक सावध आणि सजग राहण्याचा सल्ला यावेळी जाणकार लोकांनी दिला आहे. वळवाचा पाऊस आहे यामुळे विज पडण्याची देखील घटना घडू शकते परिणामी शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनाची देखील काळजी घेतली पाहिजे असा सल्ला जाणकारांनी दिला आहे.