Ahilyanagar Weather Update : गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात तापमानाचा पारा 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला होता. मात्र, नुकत्याच दोन-तीन दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे आणि गारपिटीचे सत्र सुरू झाले आहे. गेल्या महिन्यातही वादळी पाऊस आणि गारपीट झाली होती आणि आता या चालू महिन्यातही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.
विदर्भ अन मराठवाड्यातील काही भागात वादळी पाऊस आणि गारपीट झाल्याची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मध्य महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी हलका पाऊस झाला आहे. यामुळे राज्यातील काही भागांमध्ये तापमानाचा पारा हा काहीसा कमी झाला आहे.
परंतु या वादळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. दरम्यान, विदर्भ आणि मराठवाड्यातील तथा उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानात घट आली आहे. मात्र असे असले तरी अजूनही राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान चाळीस अंश सेल्सिअस पेक्षा अधिक नोंदवले जात आहे.
म्हणजे राज्यात अजूनही उकाडा कायम आहे. उकाड्यामुळे नागरिक अक्षरशा हैराण झाले आहेत. मात्र, राज्यात अजूनही वादळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज वादळी पावसाची शक्यता आहे.
तसेच आज विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होऊ शकते असेही हवामान खात्याने आपल्या नवीन अंदाजात स्पष्ट केले आहे. अशा परिस्थितीत आता आपण भारतीय हवामान खात्याने आज कोण-कोणत्या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये गारपीटीचा अंदाज दिला आहे याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
कुठे बरसणार वादळी पाऊस
काल अर्थातच 10 एप्रिलला राज्यातील बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, परभणी, बीड, लातूर, नांदेड, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस पाहायला मिळाला आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये गारपिटीने सुद्धा तडाखा दिला आहे.
दरम्यान आजही गारपीट आणि वादळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे. आयएमडीने सांगितल्याप्रमाणे आज राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होईल असा अंदाज आहे.
आज 11 एप्रिल रोजी राज्यातील अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला असून या पार्श्वभूमीवर सदर जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी झाला आहे.
तसेच आज विदर्भ विभागातील वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली या सहा जिल्ह्यांमध्ये गारपीट होईल अशी शक्यता असून या पार्श्वभूमीवर या संबंधित जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.