Ahilyanagar News : सध्या जिल्ह्यात अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यातच आता शाळकरी मुलांचे देखील अपहरण करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.

नुकतीच कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथील शाळेत जाणाऱ्या एका शाळकरी मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना ग्रामस्थांनी चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.

उक्कडगाव येथील पाचवीत शिकणाऱ्या दहा वर्षे वयाच्या मुलाचा अपहरणाचा प्रयत्न ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे उधळून लावण्यात आला. तसेच ग्रामस्थांनी दोघाना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

अस्लम अजमेर पठाण व शरीफखान मस्तानखान पठाण अशी पोलिसांच्या ताब्यात दिलेल्या त्या दोघांची नावे आहेत. या आरोपींविरुद्ध मुलास पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत उत्तम विष्णू निकम यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. ८ ऑगस्ट रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास मुलगा शाळेत जात असताना मोटार सायकलवरून आलेल्या दोघांनी आमच्या सोबत गाडीवर बस, आम्ही तुला शाळेत सोडून देतो असे म्हणाले. मात्र मुलाने घटनास्थळावरून धूम ठोकली.

थोड्यावेळाने मुलगा पुन्हा दप्तर घेऊन शाळेत जाण्यास निघाला. वरील आरोपी त्याच्यासमोर परत आले त्यांना पाहताच मुलाने पुन्हा धूम ठोकली. एका महिलेच्या घरात घुसला व सर्व प्रकार त्या महिलेला सांगितला.

दरम्यान त्या महिलेच्या मुलाने निकम यांना फोन करून घटना सांगितली. त्यानंतर फिर्यादी निकम व काही ग्रामस्थांनी आरोपींना पकडले. त्यांची त्यांची नावे अस्लम अजमेर पठाण व शरीफखान मस्तानखान पठाण (रा. कठोरा बाजार ता. भोकरदन, जि. जालना) असे सांगितले.

ग्रामस्थांनी दोन्ही आरोपींना चांगला चोप दिल. त्यानंतर दोन्ही आरोपी व त्यांची दुचाकी पोलिसांच्या ताब्यात दिली. आरोपींकडे दुचाकीच्या डिकीत लाकडी दांडे, करवती, कटावणी असे साहित्य मिळून आले.