Ahilyanagar News : कधी कडाक्याची थंडी तर कधी मध्यम स्वरूपाचा पाऊस तर कधी ऊन अशा बदलत्या वातावरणामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी वर्ग त्रस्त झालेला आहे.
जिल्ह्याच्या विविध भागात गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला. त्यामुळे शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेला घास जाण्याची भीती शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.
सतत बदलत असलेल्या वातावरणामुळे पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मध्यंतरीच्या काळात कांद्याच्या भावाने उसळी घेतली होती. परंतु मार्केटमध्ये कांद्याची आवक वाढल्यामुळे भाव कोसळले. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे.
बाजारात वाढत असलेल्या कांद्याच्या भावामुळे काही शेतकरी मित्रांनी कर्ज काढून पिकांसाठी खर्च केला. परंतु सध्या मिळणाऱ्या भावामुळे उत्पादनासाठी झालेला खर्च तरी निघून येईल का? असा प्रश्न प्रत्येक शेतकरी मित्राला पडलेला आहे. सतत बदलत असणाऱ्या हवामानामुळे कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
त्यात ढगाळ वातावरण आणि पावसाची धास्ती निर्माण झाल्याने हरभरा, ज्वारी, गहू या रब्बी पिकांवर विविध रोगाचा व किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर परिणाम होतो.
भाजीपाल्यावर मावा, अळ्या, फुल किड्यांमुळे भाजीपाल्याची गुणवत्ता कमी होते. परिणामी कमी भाव मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात खर्च वाढल्याने शेतकरी वर्गाने बदलत्या वातावरणाचा धसका घेतलेला आहे.
पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून औषधाची फवारणी करावयाची ठरवल्यास येणारा खर्च आवाक्याबाहेरचा आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झालेला आहे. इकडे आड, तिकडे विहीर अशी अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे.
सध्या मिळणाऱ्या भावामुळे उत्पादनासाठी झालेला खर्च तरी निघून येईल का असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. सतत बदलत असणाऱ्या हवामानामुळे कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हरभरा, ज्वारी, गहू या रब्बी पिकांवर विविध रोगांचा व किडीचा प्रादुर्भाव वाढलेला असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे