Ahilyanagar news : विधानसभा निवडणुकीच्या २८८ जागांसाठी बुधवारी मतदान पार पडले. आज सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून त्यामुळे आता निकाल काय लागणार? कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २० नोव्हेंबरला मतदान झालं आणि आज २३ नोव्हेंबरला मतमोजणी होत असून काही क्षणातच अंतिम निकाल लागणार आहे.

यात अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ मतदारसंघात कोण आमदार होणार याचा आज फैसला होणार आहे. तसेच काही मतदारसंघात दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून चुरशीची लढत पाहायला मिळते आहे.
या विधानसभेत जिल्ह्यातील बड्या नेत्यांचे पानिपत होणार असल्याचे दिसत असून मतमोजणीत अनेक नवख्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे दिसत आहे.

यात जिल्ह्यातील आघडीवर असलेले उमेदवार

नगर शहर – संग्राम जगताप २०२३९ मतांनी आघाडीवर.

श्रीगोंदा – विक्रम पाचपुते ७३५१ मतांनी आघाडीवर

कर्जत जामखेड – राम शिंदे १०४२ मतांनी आघाडीवर.

शेवगाव पाथर्डी – चंद्रशेखर घुले पाटील ८०७५ मतांनी आघाडीवर

राहुरी – शिवाजी कर्डीले २५७८ मतांनी आघाडीवर

संगमनेर – अमोल खताळ ७०४६ मतांनी आघाडीवर

शिर्डी – राधाकृष्ण विखे १९६६१ मतांनी आघाडीवर.

कोपरगाव – आशुतोष काळे ४३७९४ मतांनी आघाडीवर

नेवासे – विठ्ठल लंघे ६००९ मतांनी आघाडीवर.

श्रीरामपूर – हेमंत ओगले ६८७० मतांनी आघाडीवर

अकोले – अमित भांगरे ६५०९ मतांनी आघाडीवर