Ahilyanagar News : जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण राज्यालाच संतांची भूमी म्हणून संबोधले जाते, त्यामुळे विविध ठिकाणी त्या – त्या संतांची एक अनोखी परंपरा आज देखील ती – ती गावे जपत आहेत.

आज आपण जाणून घेणार आहोत पारनेर – जुन्नर तालुक्याच्या हद्दीवर असणाऱ्या आणे या गावातील आमटी- भाकरीच्या महाप्रसादाबाबतची माहिती ज्या महाप्रसादाचा नावलौकिक जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात आहे.

जुन्नर तालुक्यातील आणे येथील श्री रंगदास स्वामी पुण्यतिथीनिमित्त आयोजित वार्षिक यात्रोत्सवास गावात लाखो भाविक या वार्षिक यात्रोत्सवात येतात. शेकडो वर्षांची आमटी-भाकरीची परंपरा आजही ग्रामस्थांनी अविरतपणे चालू ठेवली आहे.

या गावच्या यात्रोत्सवाची ही १३८ वर्षांची परंपरा आहे. नववर्षाच्या प्रारंभी रंगदास स्वामी पुण्यतिथीनिमित्त वार्षिक यात्रोत्सव आयोजित करण्यात येतो. आमटी भाकरीच्या महाप्रसादामुळे येथील यात्रा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.

यंदा देखील महाराष्ट्रातून आलेल्या लाखो भाविकांसाठी २ लाख भाकरी तर ७० मोठ्या कढयांमध्ये तयार केलेला आमटीचा महाप्रसाद बनविण्यात आला
होता.या आमटीसाठी तब्बल १० लाख रुपयांचा मसाला दानशूर अन्नदात्यांच्या माध्यमातून पुरविण्यात आला. ३० डिसेंबर ते १ जानेवारी या तीन दिवसांच्या कालावधीत हा सर्व सोहळा पार पडतो.

येथील रंगास्वामींच्या वार्षिक यात्रोत्सवानिमित्ताने आणे गावातील अन्नदात्यांकडून कढईप्रमाणे मसाला व इतर पदार्थांसाठी स्वइच्छेने दान दिले जाते. या एका वार्षिक यात्रोत्सवामध्ये ७० जम्बो कढई आमटीचे अन्नदात्यांची जणू रांगच लागली आहे. या आमटीच्या प्रसादासाठी सन २०३४ पर्यंत अन्नदात्यांचे बुकिंग झाले असल्याची माहिती देवस्थानकडून दिली आहे.