Ahilyanagar News : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड आज पोलिसांना शरण येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,२४ तासाच्या आत वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वाल्मिक कराड यांच्यावर पवनचक्की कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा गुन्हा दाखल केल्यानंतर वाल्मिक कराड हे महाराष्ट्रभर चर्चेत आले होते.

संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मीक कराड खंडणी प्रकरण हे सध्या सीआयडी कडून तपास केला जात आहे यासाठी सीआयडीच्या नऊ पथकांमार्फत तब्बल दीडशे अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा तपास आणि शोध सुरू आहे. तसेच दुसऱ्या बाजूला बीड पोलिसांकडूनही या प्रकरणांचा तपास सुरू आहे या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत १०० जणांचा जबाब घेतल्याचे बोललं जात आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीचे ९ पथक तयार करण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आरोपींचे मोबाईल डेटा सीआयडीने तपासल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वाल्मिक कराड याच्याह फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

तसेच वाल्मिक कराड याच्या नातेवाईकांचीदेखील बँक खाती गोठवण्यात आली आहेत. वाल्मिक कराड याचंही बँक खातं गोठवण्यात आलं आहे, अशी देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. काही ठिकाणाहून अशी देखील माहिती समोर येत आहे की, वाल्मिक कराड हे सरेंडर देखील होऊ शकतात.

स्कॉर्पिओ गाडीत सापडलेले मोबाईल प्रयोगशाळेत पाठवले आहेत. त्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही. पण या प्रकरणातील सर्व कॉल, व्हाट्सअप कॉल हे सर्व तपासण्याचं काम सीआयडीकडून सुरु आहे. हे काम सुरु असतानाच वाल्मिक कराड यांचं बँक खातं देखील गोठवण्यात आलं आहे.

त्याचबरोबर इतर आरोपींचीदेखील बँक खाते गोठवण्यात आले आहेत. तसेच आरोपींच्या नातेवाईकांचे देखील बँक खाते गोठवण्यात आल्याची शक्यता आहे. या सर्व कारवाईनंतर वाल्मिक कराड पुढच्या २४ तासात स्वत:ला सरेंडर करणार का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.