Ahilyanagar News : सध्या बदलत्या हवामानामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. त्यामुळे मात्र जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साथीच्या आजारांचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आहे. शहरात व अनेक तालुक्यात सध्या डेंग्यू, मलेरिया, गोचिडताप यासारखे साथरोगाचा प्रसार झाला असल्याचे दिसून येत आहे.
सध्या एकीकडे डेंग्यू, मलेरिया, गोचिडताप या आजरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करत असताना आता झिका विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्यात सर्वाधिक धोका गर्भवतींना आहे.
संगमनेर शहरामध्ये झिकाच्या रुग्ण संख्येमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये गर्भवती महिलांची संख्या जास्त आहे. आत्तापर्यंत झिका व्हायरसची लागण झालेले १० रुग्ण आढळून आले आहेत.
यामध्ये तब्बल ९ गर्भवती महिलांना झिका व्हायरची लागण झालेली आहे. ही झिका व्हायरसची सर्वात जास्त लागण ही गर्भवती महिला, लहान मुले त्यांच्यासह वृध्दांना देखील होत आहे. त्यामुळे संगमनेरकरांची चिंता वाढली आहे. यामुळे आरोग्य विभागावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
जिल्ह्यात केवळ संगमनेर शहरातच झिकाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. यापूर्वी अवघे तीनच रुग्ण होते. मात्र आता ही संख्या दहावर गेली आहे. संगमनेर शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून झिका विषाणूचा संसर्ग वाढत आहे.
आतापर्यंत शहराच्या वेगवेगळ्या भागांतील ९ गर्भवतींना झिका विषाणूंचा संसर्ग झाल्याचे निदान झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात डेंग्यूने देखील चांगलच कहर केला आहे. दहा दिवसात २५ रुग्ण वाढले असून रुग्णासंख्येने आता शंभरी गाठली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १०१ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहे.
त्यात महापालिका हद्दीत रुग्ण संख्या मोठी आहे. ३१ वर शहरात रुग्णांची संख्या पोहचली असून महापालिकेकडून सध्या विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. अर्थात महापालिकेचा आरोग्य विभागातर्फे करणाऱ्यात येणार सर्वेक्षणातून ही रुग्ण संख्या समोर आली आहे. प्रत्यक्षात सध्या नगर शहरात साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे.
गोचिडताप, चिकूनगुण्या, सर्दी, खोकला, ताप यांचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढले असून खाजगी रुग्णालय रूग्णांनी फुल झाले आहेत. ही झिका व्हायरसची सर्वात जास्त लागण ही गर्भवती महिला, लहान मुले त्यांच्यासह वृध्दांना देखील होत आहे. त्यामुळे संगमनेरकरांची चिंता वाढली आहे. यामुळे आरोग्य विभागावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.