Ahilyanagar News : अनेकदा जास्त पावसामुळे नुकसान झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत दिली जाते. मात्र यासाठी अचूक आकडेवारी मोजणे आवश्यक असती.

अन्यथा नुकसान होऊन देखील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत दिली जात नाही. त्यामुळे या सर्वात पर्जन्यमापक यंत्रे महत्वाची भूमिका बाजवतात.

अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाचे आगार असलेल्या हरिश्चंद्रगड, कळसूबाई शिखरासह भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे या पावसाने या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

प्रशासनाने या भागात दररोज पडणाऱ्या पावसाचे प्रमाण अचूक मोजता यावे, यासाठी पर्जन्यमापक यंत्रे कार्यान्वित केली आहेत. मात्र ती अत्यंत कमी आहेत.

त्यामुळे पावसाने होऊन देखील शेतकऱ्यांना लाभापासून वंचित रहावे लागत आहे. पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदाने मिळणे दुरापास्त झाल्याने बळीराजासमोर मोठा आर्थिक पेच निर्माण झाला आहे.

या भागातील अनेक गावात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो मात्र त्याची ती आकडेवारी समोर येत नसल्याने धुव्वाधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळावी, यासाठी गाव तेथे पर्जन्य मापक यंत्रे बसविण्याची मागणी केली आहे.

कारण तालुक्यात प्रचंड पाऊस पडूनदेखील केवळ तांत्रिक त्रुटींमुळे कमी पावसाचे योग्य मोजमाप होवून, शेतकऱ्यांना नुकसान भरपाईमध्ये अडथळा निर्माण होत आहे.

अकोले तालुक्यात होणारी अतिवृष्टी, मुसळधार पाऊस व दुष्काळाची तीव्रता मोजण्यासाठी पावसाचे प्रमाण नेमकं किती, याची अचूक माहिती मिळणे आवश्यक असते पीक विमा योजनेत आपत्कालीन परिस्थिती मोजण्यासाठी पावसाच्या प्रमाणाची गरज असते.

पर्जन्यमापकांच्या साहाय्याने हे करणे शक्य होते. पूर्वी काही ठिकाणी पारंपरिक पर्जन्यमापक बसविले होते, मात्र त्यांची अचूकता कमी होती.

अकोले तालुक्यातील जनतेला पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शासकीय लाभापासून वंचित रहावे लागत आहे. पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदाने मिळणे दुरापास्त झाल्याने बळीराजासमोर मोठा आर्थिक पेच निर्माण झाला आहे. या बिकट पार्श्वभूमीवर पाऊस पडणाऱ्या ठिकाणी पर्जन्यमापक यंत्रे उपलब्ध करुन देण्याची मागणी केली जात आहे.