Ahilyanagar News : विधानसभेचे मतदान पार पडले आता निकालाची उत्सुकता लागली आहे मात्र काल पाथर्डी तालुक्यात मोठ्या प्रमाणात राडा झाला असून यामुळे जिल्ह्याच्या नावाला गालबोट लागले आहे. काळ सकाळपासूनच पाथर्डी तालुक्यात लहान मोठ्या चकमकी सुरु होत्या.
रात्री मात्र तालुक्यातील शिरसाठवाडी मतदान केंद्रावर आमदार मोनिका राजळे आल्या असता त्यांच्यावर बुधवारी सायंकाळी दगडफेक करण्यात आली. यात आमदार राजळे यांच्यासह त्यांचे चार सहकारी देखील यात जखमी झाल्याची घटना घडली आहे.
त्यानंतर मोठा पोलीस बंदोबस्त या या गावात तैनात करण्यात आला होता. त्यानंतर आमदार राजळे पाथर्डीत आल्या दरम्यान ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. त्यामुळे पाथर्डी शहरात मोठ्या संख्यने नागरिक जमा झाले होते. मात्र आमदार राजळे यांनी त्यांना शांतता ठेवण्याचे आवाहन केले. दरम्यान आज पाथर्डी तालुक्यात बंदची हाक देण्यात आली आहे.
सकाळी शेवगाव – पाथर्डी मतदारसंघात विधानसभा निवडणुकीचे मतदान सुरू असताना आमदार मोनिकाताई राजळे व जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या प्रभावती ढाकणे यांच्यात भारजवाडी मतदान केंद्रावर शाब्दिक चकमक झाली.
पाथर्डी शहरातील मराठी मुलांच्या शाळेत बूथ क्रं. २४२ वर संगीता अमोल पालवे यांचे मतदान दुसरेच कोणीतारी करून गेल्याचे दिसले. याबाबत लेखी तक्रार केली आहे. मतदार संघात ६२ टक्के मतदान झाले. किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत पार पडले.
पाथर्डी तालुक्यात भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदान प्रक्रियेमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. यंदा मतदान केंद्राच्या बूथवर महिलांची लक्षणीय गर्दी होती. किरकोळ वाद वगळता तालुक्यात शांततेत मतदान पार पडले. सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली होती.
सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रामध्ये आलेल्या मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावला. बाहेरगावी स्थायिक असलेले मतदार मोठ्या संख्येने आपल्या मूळ गावी मतदानासाठी आले होते. महायुतीच्या उमेदवार मोनिका राजळे यांनी त्यांच्या कासार पिंपळगाव गावी सकाळी मतदान केले. महाविकास आघाडीचे उमेदवार प्रताप ढाकणे यांनी अकोला येथे मतदान केले. अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले यांनी दहिगाव तर हर्षदा काकडे यांनी वरूर येथे मतदानाचा हाक्क बाजवला