Ahilyanagar News : नगर सकाळच्या पहिल्या टप्प्यातील दोन तासांत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातपहिल्या टप्यातील दोन तासांत नगर मतदारसंघात ५.६८ टक्के मतदान झाले असताना
सकाळी ९ ते ११ दरम्यान मतदानाची टक्केवारी वाढून ते मतदान १४.८५ टक्क्यांवर गेले होते. दुपारनंतर मात्र मतदानाचा वेग वाढला होता.
दुपारी ३ वाजेपर्यंत ४१.७० टक्के मतदान झाले होते. नगर शहरातील अनेक मतदान केंद्रांवर दुपारी ३ नंतर मतदान केंद्रांच्या आत जाण्यासाठी वेटिंगवर होते.
सायंकाळी सहानंतरही अनेक केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून येत होत्या. नगर शहरात शेवटचे मतदान ८ वाजून १ मिनिटांनी झाले.
नगर दक्षिण लोकसभा मतदार संघासाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी पहिल्या टप्प्यातील ७ ते ९ या दोन तासांत नगर लोकसभा मतदारसंघात १ लाख १२ हजार ५०५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
या टप्यात अवघे ५.६८ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर ११ वाजेपर्यंत २ लाख ९४ हजार ३८५ मतदारांनी मतदान केले. या दुसऱ्या टप्यात १४.८५ टक्के मतदान झाले होते.
दुपारी १ वाजेपर्यंत तिसऱ्या टप्प्यात ५ लाख ९३ हजार १६० मतदारांनी मतदान केले होते. या तिसऱ्या टप्यात २९.९३ टक्के मतदान झाले होते.
दुपारी तीन वाजेपर्यंत ८ लाख २६ हजार ५२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या चौथ्या टप्प्यात ४१.७० टक्के मतदान झाले होते.
दरम्यान, भर उन्हातही ठिकठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक ठिकाणी मतदान प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याची तक्रार नागरिकांनी केली. मतदानासाठी तासभर रांगेत उभे राहावे लागत होते.