Ahilyanagar News : श्रीगोंदे वीज आली तरी विहिरीवरील पंप चालू का होत नाही, म्हणून पहायला गेलेला अमोल दत्तात्रय दळवी, वय ४० या तरुणाचा विजेचा धक्का लागून जागेवर मूत्यू झाला.
ही घटना काष्टी शिवारात घडली असून याबाबत श्रीगोंद पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली.
श्रीगोंद तालुक्यातील काष्टी येथील रहिवासी लिंपणगाव हद्दीत रहाणारा अमील दळवी हा शेतकरी शनिवारी सकाळी सहा ते दु दुपारी दोन हा विजेचा टायमिंग असल्यामुळे छाईट आली तरी विहिरीवरील विजेचा पंप चालू का झाला नाही, माणून अमोल विहिरीवर सकाळी नऊ वाजता पहायला गेला.
परंतु तेथे बीजपंपाच्या खोक्यात विद्युत प्रवाह उरल्यामुळे अमोलने खोक्याला हात लावताच विजेचा धक्का त्याला बसला आणि तो जागेवरच पडला. विहिरीवरील मोटरपंप चालू करायला गेलेला अमोल बराच वेळ झाला, तरी घरी का येईना म्हणून कुटुंबातील व्यक्ती पहायला गेले, तर अमोल विहिरीवरील खोक्याजवळ पडलेला दिला.
क्षणाचाही वेळ न घालवता त्याला काष्टीतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तेथून श्रीगोद येथील ग्रामीण रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करून दुपारी तीन वाजता त्याच्यावर रहात्या घराजवळ शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले.
कुटुंबातील कल्यां मुलाचा मृतदेह पाहून आई-वडील, पत्नी मुलांनी आक्रोश केला. हे विदारक चित्र पाहून अनेकांच्या डोळ्यात आश्रुचा बांध फुटला. अतिशय शांत संयमी अमोल हा गावातील तरुणांचा लाडका होता. त्याच्या मागे आई, वडील, पत्नी, भाऊ, एक मुलगा असा परिवार आहे. त्याच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होते.