राहुरी खुर्द : नगर-मनमाड रस्त्यावर महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्र असणाऱ्या धर्माडी टेकडी, पाणी व्यवस्थापन प्रकल्पासमोर गॅस वाहतूक करणाऱ्या एका वाहनाच्या टाकीमधून गॅस गळती सुरू झाली. मात्र, पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टाळली आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्र असणाऱ्या धर्माडी टेकडी, पाणी व्यवस्थापन प्रकल्पासमोर एका वाहनाच्या टाकीमधून गॅस गळतीची माहिती मिळताच
पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी तात्काळ सुरक्षा कर्मचाऱ्यांची टीम घेऊन दुर्घटना टाळण्यासाठी प्रसंगावधान राखून रस्त्यावरील वाहनाची रांग लागलेली असताना,
योग्य नियोजन करून सदर गॅसच्या वाहनातील गॅस टाक्या पूर्ण रिकाम्या केल्या. त्यानंतर काही वेळानंतर वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात आली.
त्यामुळे राजस्थानमध्ये वायुगळतीतून झालेल्या स्फोटासारखी गंभीर दुर्घटना टाळली आहे. सदर कारवाईमध्ये डी. एन. जाधव, दत्तात्रय रवी काळे, अक्षय येणारे यांच्यासह इतर सुरक्षा रक्षकांनी तत्परता दाखवल्यामुळे मोठी दुर्घटना टाळली.
राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व त्यांचे कर्मचारी तसेच सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे व त्यांचे सुरक्षा रक्षकांचे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील व विद्यापीठ कर्मचारी, अधिकाऱ्यांकडून कौतुक होत आहे.