Home अहिल्यानगर गवार १४० लसूण ३५०, शेवगा २५० रुपये किलो; मात्र शेतकऱ्यांच्या हातात किती...

गवार १४० लसूण ३५०, शेवगा २५० रुपये किलो; मात्र शेतकऱ्यांच्या हातात किती ?

Ahilyanagar News : सध्या एकीकडे तापमानात कमालीची घट झाली असून पारा ९ अंशावर आला असल्याने जिल्ह्यात थंडीचा चांगलाच कडाका वाढला आहे तर दुसरीकडे आवक घटल्याने भाजीपाल्याचा देखील चांगलाच भडका उडाला आहे. मात्र बाजारात झालेल्या भाववाढीच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या हातात किती पैसे मिळतात हे देखील महत्वाचे आहे. कारण जरी भाज्यांचे भाव वाढले असले तरी शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळतोच असे नाही.

पावसाळ्यानंतर हिवाळ्यात शकतो सर्वच भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात आवक वाढते त्यामुळे भाज्यांचे दर कमीच असतात. त्यामुळे नेहमीच या हंगामात भाव कोसळतात परिणामी झालेला खर्च देखील वसूल न झाल्याने अनेकदा शेतकऱ्यांना भाज्या रस्त्यावर फेकून देण्याची वेळ येत असल्याचे यापूर्वी घडले आहे. हा अनुभव पाहता यंदा अनेकांनी भाज्यांची लागवड करणे टाळले.

त्यामुळे यंदा भाज्यांची लागवड कमी व त्यात परतीच्या पावसामुळे शेतमालाला मोठ्या प्रमाणात फटका बसला असून यामुळे उत्पन्न खूप घटले आहे. याचा परिणाम म्हणून सध्या विविध भाजीपाल्याच्या दरवाढीत झाला आहे. सध्या अनेक भाज्यांना १०० रूपयांच्या पुढे तर काही भाज्या ५० ते ६० रूपये किलोप्रमाणे विकल्या जात आहेत.

यंदा जुनच्या सुरूवातीलाच पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस, सोयाबीन तसेच कांद्याची लागवड केली होती. मात्र नंतरच्या काळात संततधार पावसाने सर्वच पिकांना फटका बसला. यात भाजीपाला देखील सापडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

दरम्यानच्या काळात अनेकांनी परत भाज्यांचे भाव कोसळतात त्यामुळे भाज्यांची लागवड केली नाही. तर काही मोजक्याच शेतकऱ्यांनी लागवड देखील केली मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे रोगराई वाढून त्यांच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होवून उत्पन्न कमी झाले. त्यामुळे सध्या बाजारातभाजीपाल्याची आवक कमी होत असल्याने भाववाढ झाली आहे.

बाजार समितीत मिळालेले दर पुढीलप्रमाणे (क्विंटलमध्ये) : टोमॅटो १००० ४०००, वांगी १०००-५०००, फ्लॉवर ७०० ३५००, कोबी ६०० २५००, काकडी ६०० २५००, गवार ५००० १४,०००, घोसाळे १००० – ३५००, दोडका १५०० – ५०००, कारले १००० ५०००, भेंडी १५००-५५००, वाल १५०० ५०००, घेवडा २००० – ५०००, तोंडुळे ३००० – ३०००, डिंगरी ३०००-८०००, बटाटे १६००० – ४०००, लसूण १६००० – ३५०००, हिरवी मिरची १५०० – ४५००, शेवगा १५००० २६०००, लिंबू ८०० – ३०००, आद्रक २००० ६५००, दू.भोपळा ५०० – १५००, शिमला मिरची १५०० ५०००, मेथी ६०० ३९००, कोथिंबीर ९०० ३६००, पालक १२००-२०००, शेपू भाजी १६००-२६००, चूका, चवळी ७०० ४०००, हरभरा १३०० १५००, डांगर ८०० २०००, कांदा पात ३००० ७५००, वाटाणा ४००० – ८०००.