Ahilyanagar News : सध्या वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे साथीचे आजार मोठ्या प्रमाणात बळावतात यात सर्दी – खोकला सर्वाधिक वाढला आहे.
मात्र हिवाळ्यात सर्दी- खोकल्याचा त्रास होणे, ही सामान्य बाब आहे.
असे असताना त्यावर उपाय म्हणून अनेकजण कफ सिरप घेतात. मात्र हे खोकल्याचे सिरप डॉक्टरांच्या चिट्ठी शिवाय मेडिकल स्टोअरमधून अगदी सहज उपलब्ध होते.
परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कफ सिरपसारखी औषधे घ्यावीत. कारण अतिप्रमाणात कफ सिरप घेतल्यास धोकादायक ठरू शकते. कफ सिरप प्यायल्याने मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
त्यामुळे साधा सर्दी-खोकला असला, तरीही डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी आणि त्यांनी लिहून दिलेली औषधे घ्यावीत, असा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे.
कफचे दोन प्रकार असतात. ड्राय कप आणि वेट कफ. ड्राय कफसाठी सिरप वेगळे असते. ज्यात खोकला थांबविण्याचे गुणधर्म असतात. तो खोकला इरिटेशनमुळे होत असल्याने तो थांबणे गरजेचे असते, परंतु वेट कफ बाहेर पडणे गरजेचे असते.
यात कफ सप्रेसेंट सिरप घेतले, तर तो कफ आतमध्ये जमा होऊन बाहेर न पडता निमोनियासारखे गंभीर इन्फेक्शन तयार करू शकतो. परिणामी रुग्णांना व्हेंटिलेटर सुद्धा लागू शकतो.
मेडिकल स्टोअरवर विविध कंपन्यांचे कफ सिरप मिळतात. पन्नास-शंभर रुपये दिल्यानंतर कफ सिरप बॉटल दिली जाते. ही औषधे ऑनलाइन सुद्धा मागविली जातात. अनेकदा गरज नसताना देखील असे औषध घेतल्यानंतर त्याचे विपरित परिणाम शरीरावर होऊ शकतात.
खोकल्याचे सिरप घेण्याचे प्रमाण निश्चित असते. डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहून देताना औषध कसे घ्यावे, ते किती प्रमाणात घ्यावे, हे लिहून देतात. त्यामुळे स्वतःच्या मानाने अशी औषधे घेऊ नयेत.
काही कप सिरपमध्ये काही औषधांनी हाताचा थरकाप होणे, मळमळ होणे असे प्रकारे होतात. त्यामुळे एकच कफ सिरप सर्व कफला चालत नाही. त्यामुळे डॉक्टरच्या सल्ल्याने हा ड्राय कफ आहे की, वेट कफ याची खात्री करूनच त्याप्रमाणे एक्सपेक्टोरंट किंवा कफ सप्रेसेंट जे गरजेचे आहे.