Agricultural News
Agricultural News

कापूस हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते व महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावर कपाशी पिकाची लागवड करतात.

कपाशी पिकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कपाशीचा महत्त्वाचा एक हंगाम संपल्यानंतर तेच कपाशीचे पीक शेतात फरदड स्वरूपात ठेवले जाते व अशा कपाशीच्या फरदडी पासून कापसाचे उत्पादन मिळवले जाते.

कापसाच्या फरदडीचा विचार केला तर यापासून शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा खर्च न करता कापसाचे जास्तीत जास्त उत्पादन मिळते. मागील काही वर्षांपासून कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड आळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कृषी तज्ञांकडून फरदड ठेवू नये अशा प्रकारचा सल्ला दिला जातो.

परंतु तरीदेखील आजही बरेच शेतकरी फरदड ठेवतात व अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करतात. परंतु फरदडी पासून जर चांगले कापसाचे उत्पादन हवे असेल तर यामध्ये देखील वाणाची निवड खूप महत्त्वाचे ठरते. कारण कपाशीचा प्रत्येकच वाण फरदडी पासून चांगले उत्पादन देईल असे होत नाही.

त्यामुळे फरदडी पासून चांगले उत्पन्न मिळेल अशा वाणाची लागवडीसाठी निवड करणे गरजेचे असते.कारण खर्च कमी आणि उत्पादन मिळत असल्यामुळे फरदड ही कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरते.

फरदडी पासून कापसाचे उत्तम उत्पादन मिळवण्यासाठी हा वाण आहे महत्त्वाचा

तुम्हाला देखील यावर्षी कपाशी लागवड करायची असेल व पुढे फरदड ठेवायचे असेल तर कापसाचा कबड्डी हा वाण त्यासाठी फायद्याचा ठरू शकतो.

हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये खूपच प्रसिद्ध आणि लोकप्रिय अशी कपाशीची व्हरायटी असून मराठवाडा आणि विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर याची लागवड केली जाते. कबड्डी या व्हरायटीचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही बागायती आणि कोरडवाहू अशा क्षेत्रांमध्ये याची लागवड करू शकतात.

कपाशीची कबड्डी व्हरायटी ही लागवडी पासून साधारणपणे 160 ते 180 दिवसांनी काढणीस तयार होते. कबड्डी व्हरायटीचा बोंडाचा आकार पाहिला तर तो मोठा असतो व एका बोंडाचे वजन साधारणपणे 5.30 ग्रॅम ते सहा ग्राम इतके असते. कबड्डी व्हरायटी ही फरदड उत्पादनासाठी खूप उत्कृष्ट असून हवामान बदलाचा देखील यावर कुठलाही परिणाम होत नाही.

अगदी दुष्काळी परिस्थितीत आणि अतिवृष्टी सारख्या स्थितीत देखील या व्हरायटी पासून चांगले उत्पादन मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे तुम्हाला देखील यावर्षी कपाशी पिकाची फरदड ठेवून त्यापासून चांगले कापसाचे उत्पादन मिळवायचे असेल तर तुम्ही कबड्डी व्हरायटीची लागवड करणे गरजेचे आहे.