Ahilyanagar News : मागील काही दिवसांपासून वातवरणात होत असलेल्या बदलांचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. परिणामी शहरासह जिल्ह्यात सर्दी खोकला, घसा दुखणे आदी रुग्णाच्या संख्येत वाढ झाली आहे.

सध्या जिल्हा रूग्णालयासह खासगी रुग्णालयात याबाबतची तपासणी करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची मागील काही दिवसांमध्ये वाढ झाली असून दिवसेंदिवस रूग्णांची गर्दी वाढत आहे. दरम्यान सर्दी खोकल्याची लक्षणे एखाद्या व्यक्तीत आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांकडे तपासणीसाठी जावे असे आवाहन आरोग्यच्यावतीने करण्यात आले आहे.

सध्या अचानक होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे नागरिकांची चिंतावाढली आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच सर्दी खोकला ताप यांचा त्रास सुरू झाला आहे. विशेष म्हणजे वातावरणाच्या बदलामुळे सगळीकडे सर्दी खोकल्याची साथ मोठया प्रमाणात पसरली आहे.

यात सर्दी. खोकल्याचा आजार आणि घसा दुखणे या रुग्णांमध्ये आठवड्यापेक्षाही जास्त दिवस राहत असल्याचे दिसून आले आहे. डॉक्टरांकडे तपासणसाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे सर्दी खोकल्याची आहेत अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

वातावरणातील बदल आणि हवेतील प्रदूषणामुळे मागील काही दिवसात सर्दी,खोकला आणि घसा दुखणे आदी रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसापासून वाढ झाली आहे. त्यातच राज्यात थंडीचा कडाका वाढत असून, मंगळवारी सर्वात कमी किमान तापमान अहिल्यानगर येथे ११.६ अंश सेल्सिअस इतके होते.
दरम्यान, पुढील सहा दिवस राज्यात हवामान कोरडे राहणार असून, किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

आकाश निरभ्र असून, हवामान कोरडे आहे. तसेच उत्तरेकडून राज्याच्या दिशेने थंड वारे वाहत आहेत, त्यामुळे राज्यात थंडी वाढत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात कमाल व किमान तापमानात घट होत आहे. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान रत्न ागिरी येथे ३५ अंश सेल्सिअस इतके होते. येत्या २० ते २५ नोव्हेंबरदरम्यान, राज्यातील हवामान कोरडे राहणार असून, थंडीत वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून कळवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.