Ahilyanagar News : आजवर साधारणपणे एखाद्या व्यक्तीकडूनच चुकीचे कृत्य किंवा अपराध घडतात. अशा वेळी जर मोठा अपराध अथवा खुनासारखी घटना घडली तर अशा वेळी त्याला न्यायालयाकडून तशी शिक्षा दिली जाते. मात्र प्राण्यांना अद्याप कोणीच शिक्षा दिल्याचे एकिवात नव्हते. आता एका घटनेत थेट एक बिबट्यालाच जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे
हि घटना गुजरात राज्यातील सुरत या शहरात घडली आहे. या बिबट्याने मानवावर हल्ला करून त्याला ठार मारले होते. त्यामुळे या मानवभक्षक बिबट्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सुरत जिल्ह्यातील मांडवी येथे पकडण्यात आलेला मानवभक्षक बिबट्या झांखव येथील पुनर्वसन केंद्रातील पहिला कैदी ठरला असून, आता तो कैदी म्हणून आपले उर्वरित आयुष्य व्यतीत करणार आहे.
सध्या सुरत जिल्ह्यात बिबट्यांची संख्या दीडशेवर गेली आहे. गेल्या ६ महिन्यांत मानवांवर हल्ल्याच्या तीन घटना समोर आल्या असून, त्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, जेव्हा जेव्हा बिबट्या मानवभक्षक होतो. त्यानंतर त्याला पुनर्वसन केंद्रात पाठवले जाते.
आतापर्यंत दक्षिण गुजरातमध्ये असे केंद्र नसल्याने बिबट्यांना वडोदरा येथे पाठवण्यात यायचे. पण या मानवभक्षक बिबट्याला प्रथमच सुरत जिल्ह्यातील भक्षक प्राण्यांच्या पुनर्वसन केंद्रात आणण्यात आले आहे. सुरत जिल्ह्यात १.५० कोटी रुपये खर्चुन हे केंद्र बांधण्यात आले आहे. येथे १० बिबटे एकत्र ठेवण्याची व्यवस्था आहे.
कोणताही बिबट्या एखाद्या व्यक्तीवर हल्ला करताना आढळल्यास आम्ही त्यास चिन्हांकित करतो. त्याला ताबडतोब पकडून पुनर्वसन केंद्रात पाठवले जाते. जेणेकरून तो पुन्हा कोणावरही हल्ला करू शकत नाही, यासाठी आम्ही सुरतमध्ये बिबट्या ठेवण्याची व्यवस्था केली आहे.
या बिबट्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी मध्यभागी जंगलासारखे वातावरण तयार केले आहे, अशी माहिती उप वनसंरक्षक आनंद कुमार यांनी दिली.