Ahilyamnagar News : एकीकडे वाढत्या प्रदूषणाने आणि त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगमुळे जग हैराण असताना भारतातील हिरवळ मात्र वाढत आहे. सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट २०२३’ नुसार भारतातील वन आणि झाडांचे क्षेत्र २०२१ च्या तुलनेत २०२३ मध्ये १,४४५ चौरस किमीने वाढले आहे.

संपूर्ण जग सध्या जलवायू परिवर्तनाचा सामना करत आहेत. दिवसेंदिवस याचा वेग आणि तीव्रता वाढत आहेत. परिणामी सध्या संपूर्ण जग ‘ग्लोबल वॉर्मिंग’ ने त्रस्त झाले आहे.

विशेष म्हणजे पूर्वेकडे जपान तर पश्चिमेकडे अमेरिकापर्यंत सर्वच देशांमध्ये तापमान वाढीचे नवे विक्रम नोंदवले जात आहे. तर दुसरीकडे भारतीय उपखंडात मात्र याच्या उलट परिस्थिती आहे. मान्सूनने काही ठिकाणी रौद्र रूप धारण केले आहे. तर काही भागात मान्सूनने पाठ फिरवली आहे.

परिणामी भारतात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती तर अनेक ठिकाणी पावसाची प्रतीक्षा आहे. तर उत्तर भारतात आलेल्या पूरामुळे जवळपास 90 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.

तर देशातील अनेक शहरातील नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. मात्र, भारतात उन्हाळा संपला आहे आणि नैऋत्य मान्सूनने संपूर्ण भारत व्यापला आहे. त्यामुळे वातावरण कुठे थंड तर कुठे समशीतोष्ण आहे.

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते देहरादून येथील वनसंशोधन संस्था येथे या रिपोर्टचे प्रकाशन करण्यात आले. या भारतीय वन सर्वेक्षण (एफएसआय) द्वारे हा अहवाल तयार केला जातो. उपग्रह रिमोट सेन्सिंग डेटा आणि क्षेत्र-आधारितराष्ट्रीय वनसूचीच्या आधारे देशातील वन आणि वृक्षांच्या संसाधनांचे एफएसआय सखोल मूल्यांकन करते.

या अहवालानुसार देशातील एकूण वन आणि वृक्ष क्षेत्र ८,२७,३५७ चौ. किमी (देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या २५.१७%) आहे. यामध्ये वन क्षेत्र ७,१५,३४३ चौ. किमी (२१.७६%) असून वृक्ष क्षेत्र १,१२,०१४ चौ. किमी (३.४१%) आहे.

इतर देशांप्रमाणेच ग्लोबल वॉर्मिंगचा भारताला देखील फटका बसत आहे मात्र भारतात वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष रोपण चळवळ राबवली जात आहे.

त्यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात झाडे लावली जात आहेत. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील हिवरे बाजार गावासारखे कुरणात चराईबंदी, कुऱ्हाड बंदी असे विविध कायदे केले आहेत. तसेच आईच्या नावाने, मुलीच्या नावाने एक असे उपक्रम राबवत आहेत. त्यामुळेच मागील काही वर्षांपासून देशात झाडांची संख्या वाढली आहे.