Ahilyanagar News : श्रीरामपुरातून कोरोना काळात नाशवंत कृषी मालाच्या वाहतुकीसाठी किसान रेल गाडीची सेवा सुरुवात करण्यात आली होती. गाडीतून भाजीपाला आणि फळांची वाहतूक करण्यात येत होती. किसान रेल सेवा पुन्हा सुरू करावी,
अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. सोलापूर आणि पुणे विभागामधील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे, अहमदनगर परिसरात डाळींब,
केळी, द्राक्षे इत्यादी फळे, भाजीपाला, फुले, कांदे अशा शेतमालाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते. ही रेल्वे छोटे शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांच्या कृषी उत्पादनांच्या वाहतुकीची गरज भागवणार आहे. मार्गावरील सर्व थांब्यावर नाशवंत मालाची लोडिंग आणि अनलोडिंग करण्याची परवानगी दिली आहे.
ही सेवा सुरुवातीला आठवड्यातून एकदा असेल, तथापि वापरकर्त्यांच्या अनुभवावर आधारित आणखी सेवा वाढवली जाईल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले होते. सदर गाडी कोल्हापूरहून निघेल.
मिरज, सांगोला, पंढरपूर, कुडुवाडी, दौंड आणि अहमदनगर, बेलापूर (श्रीरामपूर) या स्थानकावर थांबा होता. सदर गाडीचे डब्बे देवळाली-मुझफ्फरपूर-द वळाली गाडीला मनमाड रेल्वे स्थानकावर जोडले व काढले जातील.
यामुळे प्रयागराज चौकी, न्यू चौकी (अलहाबाद चौकी), दिनदयाल उपाध्य (मुगलसराय), बक्सर, दानापूर (पटणा) आणि मुझफ्फरपूर यापरिसरात नाशवंत कृषी माल पाठवण्यात येत होता.
श्रीरामपुरातून कांदा, द्राक्षे, डाळिंब, पेरू पाठवता येतील
श्रीरामपूरसह राहुरी, नेवासे, कोपरगाव, संगमनेर आदी तालुक्यात कांदा, द्राक्षे, डाळिंब, पेरूचे मोठ्या प्रमाणावर पिके असतात. या तालुक्यातील शेतकऱ्यांनाश्रीरामपूर स्टेशन हाकेच्या अंतरावर आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना अल्प दरात आपला शेतीमाल बाहेर पाठवता येणार आहे. श्रीरामपूरसह राहुरी, नेवासे, कोपरगाव, संगमनेर आदी तालुक्यात कांदा, द्राक्षे, डाळिंब, पेरूचे मोठ्या प्रमाणावर पिके असतात.
या तालुक्यातील शेतकऱ्यांना श्रीरामपूर स्टेशन हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अल्प दरात आपला शेतीमाल बाहेर पाठवता येणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता.
मात्र त्यानंतर पुढे किसान रेल सेवा बंद करण्यात आली आहे. पुन्हा ही सेवा सुरू करावी, अशी मागणी होत आहे