Ahilyanagar News : सध्या बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात अनेक कामे सोपे झाले आहेत, त्यामुळे आता आपल्याला बँकेत अथवा इतर अनेक कामांसाठी अनेकवेळ रांगेत वाट पाहण्यात थांबण्याची गरज राहिली नसली तरी मात्र यात धोके देखील वाढले आहेत. त्यामुळे असे ऑनलाईन व्यवहार करताना खूप काळजी घेणे गरजचे आहे अन्यथा मोठा आर्थिक फटका बसू शकतो.
व्हॉटसअप ग्रुपवर आलेल्या एका लिंकवर क्लीक केले आणि क्षणात बँक खात्यातील ४ लाख ६३ हजार रुपये गमावून बसला. असल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी येथील पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असलेले प्रशांत सुभाष ललवाणी यांच्यासोबत हा ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार घडला आहे. याबाबत ललवाणी यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी येथील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत प्रशांत ललवाणी यांचे खाते असून त्यांनी बँकेच्या अँपवरून त्यांनी सदरील रकमेची ऑनलाईन एफडी केली होती.
८ डिसेंबर रोजी ललवाणी यांच्या व्हाट्सअप वरील एका ग्रुपला एक मेसेज आला होता. तो मेसेज त्यांनी चुकुन ओपन केला होता. त्यानंतर ललवाणी यांना लगेच मोबाईल नंबरवर चार ते पाच वेगवेगळे पंजाब नॅशनल बँकेच्या नावाने ओटीपी आले.
परंतु ते ओटीपी ललवाणी यांनी कोणासही सांगितले नाहीत. त्यानंतर ९ डिसेंबर रोजी सोमवारी रात्री ललवाणी यांनी मोबाईल पाहिला असता मोबाईबर पंजाब नॅशनल बँकेच्या नावाने तीस ते चाळीस मेसेज आलेले दिसले.
त्यानंतर ललवाणी यांनी त्यांचे बँकेतील एफडीच्या अकाऊंटचे स्टेटमेंट पाहिले असता त्यांच्या खात्यामधुन एकूण ४, ६३, ८११ रुपयांची एफडी आपोआप मोडल्या जाऊन टप्प्याटप्प्याने तीनदा ही रक्कम ललवाणी यांच्या खात्यामधुन वेगवेगळ्या तीन ट्रांन्जेक्शन आयडीने खात्यातुन कमी झालेले दिसले. याबाबत ललवाणी यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.