Ahilyanagar news : राज्यातील लक्षवेधी ठरलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघाचा निकाल हाती आला आहे. यात मतदारांनी अनेक बड्या नेत्यांना नाकारल्याचे स्पष्ट दिसत आहे. यात शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा निकाल अखेर हाती आला आहे.

भाजपचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांचा दणदणीत विजय झाला आहे. तर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात व महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांच्यात अत्यंत अटीतटीच्या लढतीत खताळ यांनी मोठी आघाडी घेतली असून आता केवळ त्यांच्या विजयाची औपचारिक घोषणा बाकी असल्याचे समोर आले आहे.

असेच चित्र जिल्ह्यात दिसत आहे शिर्डी विधानसभा मतदारसंघात पहिल्या फेरीपासूनच विखे पाटील आघाडीवर होते. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सलग आठव्यांदा शिर्डी मतदारसंघातून विजयी होण्याची किमया साधली आहे. तिरंगी लढतीत राधाकृष्ण विखे यांनी दोन्ही उमेदवारांना धूळ चारत पुन्हा एकदा आपला गड कायम राखला आहे. तर राहता येथे विखे यांच्या विरोधात मोठे रान पटवणाऱ्या काँग्रेस उमेदवार प्रभावती घोगरे यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे.

कोपरगाव मतदार संघातून महायुतीचे अजित पवार गटाचे उमेदवार आमदार आशुतोष काळे हे देखील दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. चुरशीच्या ठरलेल्या राहुरी मतदार संघामध्ये देखील प्राजक्त तनपुरे यांना मागे टाकत भाजपचे शिवाजी कर्डिले यांनी मताधिक्य मिळविले आहे.

अहिल्यानगर शहर मतदारसंघांमध्ये अपेक्षेप्रमाणे महायुतीचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनी प्रारंभी पासून घेतलेली आघाडी टिकवून ठेवत मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे.

कर्जत जामखेड मतदार संघामध्ये आघाडीवर असून विद्यमान आमदार रोहित पवार पिछाडीवर आहेत. तर सर्वात चर्चची लढाई ठरलेल्या संगमनेरमध्ये थोरात यांचा पराभव झाला असल्याची औपचारिक घोषणा बाकी असल्याचे समोर येत आहे.

या ठिकाणी १९ वी फेरी. महायुतीचे उमेदवार अमोल खताळ १३ हजार ८३७ मतांनी आघाडीवर. खताळ यांना १०४७८४ मते तर महाविकास आघाडीचे बाळासाहेब थोरात यांना ९०९४७ मते. नोटा १२९८. आता उरल्या फक्त २ फेऱ्या त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकणी देखील महायुतीचे उमेदवार मोठ्या फरकाने आघाडीवर असून विजयी होण्याची चिन्हे आहेत.