Ahilyanagar News : नेवासा तालुक्यातील तिर्थक्षेत्र शिनाई जागृत देवस्थान भानसहिवरे येथे शिनाई मातेच्या दर्शनासाठी व श्री श्री १०८ महंत गुरुवर्य बाबाजींच्या भेटीसाठी देवगड देवस्थानचे महंत गुरूवर्य भास्करगीरीजी महाराज शुक्रवारी ८ ऑगस्ट आले होते. या प्रसंगी शिनाई देवस्थानच्या वतीने उत्तराधिकारी महंत आवेराज महाराज यांच्या हस्ते महंत भास्करगिरी महाराज यांचे संतपुजन करण्यात आले.
यावेळी शिनाई संतसेवक व पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर भाऊ जोजार, बाळासाहेब भणगे, बाबासाहेब भणगे, पिंटु काळे, विलासभाऊ मोहिटे, माऊली क्षीरसागर, रमेश गुणवंत , अविनाश ढवाण, दिलीप मोहिटे, शितानाना भणगे, अर्जुन जोजार, डॉ. शुभम गायकवाड, महेश भनगे, रामा गोडसे, पोपटराव शेकडे व शिनाई भक्त मंडळ उपस्थित होते.