Ahilyanagar News : नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काल शपथ घेतली. तर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पावर यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यामुळे आता पुढे मंत्रिमंडळ शपथविविधीचा मार्ग देखील मोकळा झाला आहे. मात्र यंदा अनेकजण इच्छुक असल्याने निर्णय घेताना वरिष्ठांची चांगलीच दमछाक होणार आहे. यातील अनेक दिग्गज, मुरब्बी, तर काहींनी हॅट्रिक देखील केली आहे.

विधानसभेत राज्यात महायुतीला जवळपास ८० टक्क्यांपेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे मंत्रिपदासाठी भाजपमध्ये दावेदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे धक्कादायक घटना घडण्याची शक्यता आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातच महायुतीला दहा जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळात जिल्ह्यातील कोणाकोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता वाढली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर एकनाथ शिंदे व अजित पावर यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. आता फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात जिल्ह्यातील किती जणांचा समावेश होणार आहे याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

जिल्ह्यात १० जागांवर महायुतीला यश मिळाले आहे. यामध्ये भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील, मोनिका राजळे, शिवाजी कर्डिले व विक्रमसिंह पाचपुते, राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप, आशुतोष काळे, डॉ. किरण लहामटे व काशीनाथ दाते तर शिवसेनेचे विठ्ठल लंघे व अमोल खताळ यांचा समावेश आहे.

भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील हे मंत्रिपदासाठी प्रमुख दावेदार मानले जातात. मोनिका राजळे तिसर्‍यांदा आमदारपदी निवडून आल्या आहेत. महिला म्हणून त्या देखील दावेदार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप यांनी हॅट्रिक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मंत्रिपदासाठी त्यांचे नाव चर्चेत आहे. अजित पवार यांचे विश्वासू आहेत. तर शिवाजी कर्डिले हे सहाव्यांदा विधानसभेवर गेले आहेत. मुरब्बी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांची वर्णी देखील लागू शकते.

आशुतोष काळे हे देखील मंत्रिपदासाठी दावेदार मानले जातात. डॉ. किरण लहामटे हे आदिवासी प्रवर्गातील आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाचा देखील विचार होउ शकतो.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संगमनेर मतदारसंघातून अमोल खताळ व नेवासा मतदारसंघातून लंघे विजयी झाले. हे दोन्ही आमदारांनी सहकारात दबदबा असलेल्या नेत्यांचा पराभव केला आहे. त्यामुळे खताळ, लंघे यांच्याबाबत देखील विचार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.