Ahilyanagar news : यंदा वरुणराजाच्या वक्रदृष्टीमुळे अनेक शेतमालास फटका बसला असून त्यामुळे सध्या त्या – त्या वस्तूंची बाजारात आवक घटली असून परिणामी त्यांचे भाव वाढले आहेत.
यात राज्यातील नागरिकांच्या जिभेवर अधिराज्य गाजवणाऱ्या मेहरुणच्या बोरांचा देखील समावेश आहे. त्यामुळे या बोरांचे भाव वाढले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील मेहरुण बोरांची अतिशय गोड व रुचकर अशी सर्वदूर ख्याती आहे. मात्र यंदा कमी पर्जन्यमानामुळे पुरेशा प्रमाणात बाजारात दाखल झालेली नाहीत.
मेहरुणच्या बोरांचे उत्पादन यंदा अति पावसामुळे लांबणीवर पडले. डिसेंबरला सुरुवात झाली तरी ही बोरं पुरेशा प्रमाणात बाजारात आलेली नाही. मेहरूणच्या बोरांचा गोडवा राज्यभर लोकांच्या जिभेवर आहे. त्यामुळे मेहरुणची बोरे १०० ते १२० रुपये किलो दराने विक्री होत आहे. मेहरूणचे दर पेट्रोलपेक्षाही जास्त असल्यामुळे खवय्ये दर ऐकताच अवाक होत आहेत.
दरवर्षी नोव्हेंबरच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात येणा-या बोरांची यंदा वरुणराजाच्या वक्रदृष्टीमुळे खवय्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. मेहरूणची बोरे थोड्या प्रमाणात विक्रीसाठी शहरात आली आहे.
शहागंज, चंपा चौक, सिटी चौक परिसरात विक्रेत्यांकडे मेहरूणची बोरे दिसून येत आहे. आवक घटल्यामुळे दरांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. खवय्ये दर जास्त असूनही खरेदी करतांना दिसत आहेत. काही खवय्ये भाव ऐकूणच किलो ऐवजी पाव किलो अर्धा किलो खरेदी करत आहेत.
यंदा हवामानाच्या लहरीपनाचा फटका या बोरांना देखील बसला आहे त्यामुळे चालू वर्षी मेहरूणच्या बोराची आवक कमी असल्यामुळे दर जास्त आहे. थेट जळगावहून आम्ही माल आणून विकतो. ग्राहाकांची मागणी चांगली आहे. मालाची आवक वाढली तर दर कमी होतील. सध्या १०० ते १२० रुपये किलो दराने ग्राहक खरेदी करत आहेत.
या बोराच्या झाडाला दोन बहार येतात. झाड मोठे असेल तर १०० किलो बोरे मिळतात. दुसरा बहार येतो तेव्हा या बोरांचा आकार लहान झालेला असतो. त्यास खिरणी बोर म्हटले जाते.
संक्रांतीनंतर खिरणी बोरांचा सिझन सुरू होतो. शेतकऱ्याकडून बोरे आल्यानंतर त्यांची छाणणी होते. खराब, जादा पिकलेली, अत्यंत कोवळी बोरे काढून टाकली जातात. साधारण हिरवी पिवळसर बोरे ही जाळीदार पिशवीत घालून त्याची विक्री होते. प्रत्येक पिशवी ही एक किलोची असते.