Ahilyanagar News : विधानसभा निवडणुकीत बारा विधानसभा मतदारसंघात एकूण २७ लाख ४२ हजार २७७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत १२ जणांना आमदार म्हणून निवडून दिले आहे. या विधानसभा निवडणुकीत बारा विधानसभा मतदारसंघात १५१ उमेदवारांपैकी तब्बल ११९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. त्यातील ९८ उमेदवारांना तर ‘नोटा’ पेक्षाही कमी मते मिळाली आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेत एकूण १५१ उमेदवार उभे होते. मतदानादरम्यान एकूण २७ लाख ४२ हजार २७७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
त्यापैकी १६ हजार ३११ मते ‘नोटा’ला मिळाली. निवडणुकीत उमेदवारांना डिपॉझिट वाचवण्यासाठी एकूण वैध मतांच्या एक शष्ठांश मते आवश्यक होती. मात्र प्रमुख उमेदवार वगळता अन्य एकाही उमेदवाराला तेवढी मते मिळाली नाहीत. त्यामुळे बारामतदारसंघातील ११९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे .

२०१९ मध्ये जिल्ह्यात २० हजार ३८० मतदारांनी ‘नोटा’चे बटन दाबले होते. यंदा मात्र यात ४ हजार ७९ मतदारांची घट झाली. यंदा १२ मतदारसंघात एकूण १६ हजार ३०९ जणांनी ‘नोटा’ चे बटन दाबले आहे .

अहमदनगर शहर मतदारसंघात १४ पैकी १२ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. १६०९ नोटाला मते आहेत. १२ उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मते आहेत.

पारनेर : १२ पैकी ९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. नोटाला ९६३ मते आहेत.

श्रीगोंदा : १६ पैकी १२ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. नोटाला १०३३ मते आहेत.

कर्जत – जामखेड : ११ पैकी ९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. या मतदारसंघात अवघी ६०९ मते नोटाला आहेत.

शेवगाव- पाथर्डी : १५ पैकी ११ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. १५६१ मते नोटाला मिळाली आहेत.

अकोले : ९ पैकी ६ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. नोटाची मते २ हजार ६०६ आहेत. पाच उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मते आहेत.

राहुरी : १३ पैकी ११ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. १२६४ मते नोटाची आहेत.

संगमनेर : १३ पैकी ११ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. येथे १४७० मतदान नोटाला झाले आहे. दहा उमेदवारांना त्यापेक्षाही कमी मते आहेत.

शिर्डी : ८ पैकी ६ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. नोटाला ११२१ मते आहेत. पाच उमेदवारांना त्यापेक्षाही कमी मते मिळाली.

कोपरगाव : १३ पैकी ११ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. येथे १६९३ मते नोटाला आहेत. ९ उमेदवारांना त्यापेक्षाही कमी मते मिळाली आहेत.

श्रीरामपूर : १६ पैकी १२ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. नोटाला ६७५ मते आहेत.

नेवासा मतदारसंघात १२ पैकी ९ डिपॉझिट जप्त झाले आहे. १७२३ मते नोटाला मिळाली आहेत.