आज १३ मे नगर व शिर्डी मतदार संघात निवडणुका पार पडत आहेत. आज दोन्ही मतदार संघात सकाळपासूनच मतदान करण्यासाठी मतदार येत होता. दुपारी तीन वाजेपर्यंत ४५ टक्के मतदान झाल्याची माहिती समजली होती. परंतु बहुतांश ठिकाणी शांततेत मतदान सुरु असताना आता एक खळबळजनक प्रकार नगर शहरात घडला आहे.

मतदानाला जाण्यापूर्वीच मुस्लिम समाज, वंचित घटकाच्या मतदारांना बोटाला शाई लावून मतदानापासून वंचित ठेवले जात होते व हे एक मोठे रॅकेट नगर शहरात सक्रिय होते असा आरोप सध्या केला जातोय. याबाबतचा एक व्हडिओ सध्या व्हायरल होत आहे. या गोष्टीचा स्वतः निलेश लंके यांनी पर्दाफाश केला असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.

काय आहे या व्हिडिओत?
सध्या जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यात असे दिसत आहे की, एक व्यक्ती दुसऱ्या एका व्यक्तीला उद्देशून निलेश लंके यांना माहिती देत आहे. की हा व्यक्ती आमच्या बोटाला शाई लावत आहे. बोटाला शाई लावल्याने मतदानापासून वंचित राहावे लागू शकते.

या व्यक्तीने अनेक लोकांना असे केले असल्याचे तो सांगत आहे. तसेच असे करणारे जवळपास ३०० लोक होते असे तो सांगत आहे. त्यामुळे हे एक मोठे रॅकेट आहे असावे आरोप यात निलेश लंके करताना दिसत आहेत. शहरातील स्टेट बँक परिसरात ही घटना घडल्याचे समजते.

सध्या हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आता यावर काय प्रतिक्रिया येतात किंवा असे कृत्य करणारे व्यक्ती नेमक्या कोण होत्या व त्या असे कृत्य का करत होत्या याबाबत काय माहिती सामोरे येते ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.