Ahilyanagar News : सध्या बदलत्या काळात मित्रांसोबत गप्पा देखील ऑनलाईन मारल्या जातात. त्यामुळे प्रत्यक्षात भेटून बोलण्याचा सवालच येत नाही मात्र अशी ऑनलाईन मैत्री देखील चांगलीच महागात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुंबईसह मोठ्या शहरातील अनेक लोक मैत्री व शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन अँपप्लिकेशन व वेबसाईटचा वापर करतात. आणि या गरजा भागवण्याच्या नादात एचआयव्हीचे संक्रमण ओढून घेतात. हे त्यांना माहीत होईपर्यंत अनेक लोकांना या संसर्गाची बाधा झालेली असते.
माहितीच्या अधिकारांतर्गत जिल्हा एड्स नियंत्रण मुंबई सोसायटीने १०५६ अँप किंवा सर्च बॉक्समध्ये एड्स बाबतच्या चॅट व माहिती सर्च करणारे नागरिक ट्रेस करून त्यांनी एचआयव्हीची तपासणी केली.
त्यात ११९ लोकांना एचआयव्ही आणि सिफिलीसची बाधा झाल्याचे समोर आले.मैत्री करण्याची आवड, बोलण्याची सवय आणि त्यातून सुरू होणारी मैत्री नंतर डेटिंगपर्यंत पोहोचते.
यानंतर शारीरिक गरज पूर्ण करेपर्यंत ही मैत्री जाते. यासाठी व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, ग्रिंडर, ब्लूड, प्लेनेट्रोमियो, फेसबुक इत्यादी सोशल नेटवर्किंग साइट्स आणि फेसबुकसोशल नेटवर्किंग साइट्सचा वापर होतो.
हीच कल्पना वापरत याच प्रमाणे जिल्हा एड्स नियंत्रण मुंबई सोसायटीने एम डॅक्स हेल्थ केअर वर्कर नावाने प्रोफाईल बनवली. अॅप किंवा सर्च बॉक्समध्ये एड्स बाबतच्या चॅट करणे, माहिती सर्च करणारे नागरिक ट्रेस करून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली.
१००० जणांमध्ये १०० जणांनी या हेल्थ वर्करशी बोलण्यास सुरुवात केली. अन्य लोकांकडून या हेल्थ केअर वर्करशी बोलणे टाळले किंवा ब्लॉक करण्याचा पर्याय निवडला आणि सल्ला मिळाल्यानंतर माहिती गुपित ठेवण्याबाबत तसेच लगेच उपचाराबाबत विचारणा केली. यातील ५० जण तपासणीला आले. त्यामुळे मैत्री करा परंतु जरा जपून शेवटी जीवन एकदाच आहे .