Ahilyanagar News : मी दहावे, अंत्यविधी, वाढदिवसाला जातो मात्र त्याचे कधीच फोटोसेशन करत नाहीत. मात्र गेल्या पाच वर्षात प्रसिद्धीचा नविन फंडा आला आहे. दुःखद घटनेची देखील प्रासिद्धी केली जाते असे लोकप्रतिनिधी जन्माला आले. त्याचा पाच वर्षाचा कार्यक्रम विधानसभेच्या निवडणुकीत केला.

हा कार्यक्रम लोकसभेला व्हायला पहिजे होता. अशी टीका पारनेर – नगर विधानसभेचे आमदार काशिनाथ दाते यांनी नाव न घेता खासदार निलेश लंके यांच्यावर केली .

नगर तालुक्यातील अकोळनेर येथे एक आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, नगर तालुक्यात माझा संपर्क कमी होता. मात्र माझ्या राजकारणाची चाळीस वर्षाची यशस्वी वाटचाल होती.

पारनेर तालुक्यात सर्वाधिक निवडणुक केल्या त्यामध्ये यश मिळवल.. मी दहावे, अंत विधी वाढदिवसाला जातो मात्र त्याचे कधीच फोटोसेशन करत नाहीत. नगर तालुक्यात माजी खासदार सुजय विखे पाटील, आ. शिवाजी कर्डिले यांच्या कार्यकर्त्यानी माझ्यासाठी जिवाचे रान केले. समोरच्या उमेदवाराला प्रचारासाठी भरपूर वेळ होता.

मोहटा देवी दर्शन, महिलांना घरपोहच साडया देण्याचे काम केले. मात्र मला फक्त बारा दिवस प्रचाराला मिळाले. पारनेरपेक्षा नगर तालुक्याने चांगली परिस्थिती दाखवली. शेवटपर्यत लिड राहिले. पारनेर मतदार संघातील नागरिक लोकप्रतिनिधीच्या दंबगगिरीला कंटाळले आहे.

पाच वर्षात तरुणाचा भ्रमनिरास झाला.एमआयडिसीमध्ये एकाही तरुणाला रोजगार उपलब्ध करुन दिला नाही. हे नेतुत्व राज्याचे नेतत्व करायला निघाले होते मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पहायला निघाले होते. यांना पक्षाचे काहीच घेणे देणे नाही लंके प्रतिष्ठान राज्यात मोठे करायचे आहे.

निवडून आल्यावर दुसऱ्याच दिवशी विधानभवनात जाणारा पहिला आमदार आहे. विधानभवनात अजित पवार यांची भेट घेऊन पारनेर मतदार संघात विकास कामाबाबत चर्चा केली. आता नागपूर येथे हिवाळी अधिवेशन मार्चमध्ये अर्थसंकल्प असतो तेव्हा आपल्या भागातील कामाचे निवेदन तातडीने माझ्याकडे पोहच करा. अर्थ संकल्पात सादर करता येईल. नगर तालुक्यात ४३ गावात जास्त लक्ष राहणार असल्याचे देखील ते म्हणाले.