Ahilyanagar News : आगामी विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या अनेकांनी आताच जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र जागा एक अन उमेदवार अनेक अशी अवस्था अनेक ठिकणी झाली आहे. त्यामुळे उमेदवारी नेमकी कोणाला द्यायची असा प्रश्न पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पडला आहे.

श्रीगोंदा तालुक्यातून देखील विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची यादी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यासाठी अनेकांनी मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे. त्यामध्ये सुवर्णा पाचपुते याचीही आघाडी पाहण्यास मिळाली आहे त्याच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी बॅनरबाजी केल्याचे दिसत आहे.

जशी जशी विधानसभा निवडणूक जवळ येत आहे तशी तशी इच्छुकांची यादी मात्र वाढत चालली आहे याच इच्छुकांमधील सुवर्णा पाचपुते यांच्या कार्यकर्त्यांनी श्रीगोंदा तालुक्यामधील विविध ठिकाणी उमेदवारी फिक्स या आशयाचे बॅनर लावले होते.

मात्र हे बॅनर अनेक ठिकाणी समाजकंटकांनी फाडले तर काही ठिकाणी काढले आहेत. या अशा या प्रवृत्तीचा सुवर्णा पाचपुते यांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

सुवर्णा पाचपुते यांनी आपण उमेदवारी करणार असल्याचे जाहीर केले आहे, याची बॅनरबाजी संपूर्ण तालुक्यात त्यांच्या कार्यकर्त्यांकून करण्यात आलेली असून त्यावर काही बोध बोधवाक्य देखील लिहिली असून यामुळे त्या निवडणुकीतुन माघार घेणार नाही अशी चिन्हेदिसू लागले आहेत.

त्यामुळे यांची आपल्याला अडचण होऊ नये या तसेच मताचे विभाजन होऊ नये असे अनेकांना वाटू लागल्याने अजनूज येथील बॅनर फाडण्यात आला तर लिपणगाव, निबवी, ढवळगाव येथील बॅनर काढून नेले आहेत.

काही इच्छुक उमेदवारातील नागरिकांनी लोकांनी त्यांचे अनेक ठिकाणी लावलेले बॅनर फाडले काढले आहेत. त्यामुळे तालुक्यात निवडणुकीपूर्वीच चांगलाच राजकीय राडा सुरु झाला आहे.