Ahilyanagar News : लोकसभेत झालेल्या पराभावानंतर माजी खासदार सुजय विखे पाटील हे त्यांच्या आता ‘मला तुम्ही दहाव्याला बोलवा मी कावळ्याच्या आधी हजर होईल’ या वक्तव्याने जिल्ह्यात नव्हे तर राज्यात चर्चेत आले होते. त्यानंतर आता परत एकदा त्यांनी आपल्या साधेपणाचे नागरिकांना दर्शन घडवले आहे.
संगमनेर तालुक्यातील एका सप्ताहात हजारो भाविक आले होते. यामध्ये माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी देखील हजेरी लावत स्वतः पंगतीतील भाविकांना आमटी- भाकर वाढण्याचे काम देखील केले. यामुळे त्यांचा साधेपणा सर्वांनाच भावला असल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
विधानसभेत याच संगमनेर तालुक्यातुन त्यांनी आपली यंत्रणा कमला लावत तब्बल आठ वेळा विधानसभा निवडणूक लढलेल्या काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव केला आहे. दरम्यान या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. त्यामुळे आता विखे पाटील हे संगमनेर तालुक्यात खूप लक्ष देत आहेत.
सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक कोणतेही क्षेत्र असो तेथे नेहमीच विखे पाटील कुटुंबियांचे भरभरून योगदान असते. बोटा येथील सप्ताहाला देखील त्यांनी तीन लाख रुपयांची मदत केली. या सोहळ्यास संगमनेरसह अकोले, जुन्नर या तिन्ही तालुक्यांतून हजारो भाविक कीर्तन, प्रवचन ऐकण्यासाठी येथे येत होते.
माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी देखील या सप्ताहास भेट दिली विशेष बाब म्हणजे तीन लाख रुपयांचा धनादेश देखील त्यांनी दिला आहे. यावरच न थांबता त्यांनी हातात बादली घेऊन जेवण्यासाठी बसलेल्या भाविकांना पंगतीत जाऊन वाढण्याचे काम केले. याचबरोबर साधे राहणीमान आणि आपुलकीमुळे तरुणाई सेल्फी घेण्यासही गर्दी करतानाचे चित्र यानिमित्ताने पाहायला मिळाले.
यावेळी त्यांच्यासोबत नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ उपस्थित होते. परंतु, डॉ. सुजय विखे पाटील यांनी वाढप्याचे काम केल्याने त्यांचा हा साधेपणा सर्वांनाच भावला. या सप्ताहात गावोगावचे लोक सहभागी होऊन हजारो भाकरी आणत होते. या सप्ताहास खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार डॉ. किरण लहामटे, डॉ. जयश्री थोरात यांच्यासह सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक आदी क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या.