Ahilyanagar News : सोशल मीडियावरुन ओळख झालेल्या अनेक मुलींवर अत्याचार झाल्याची प्रकरणे वारंवार समोर येत आहेत. मुलींनी सोशल मीडिया काळजीपूर्व वापरावा व कोणावरही विश्वास ठेवू नये, असे आवाहन अनेकदा शाळा, महाविद्यालयांमध्ये पोलिसांकडून करण्यात आले होते. मात्र याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र असे करणे एक तरुणीस चांगलेच महागात पडले आहे.
इंस्टाग्रामवर ओळख झाली. नंतर हळूहळू या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. नंतर त्या तरुणीला नोकरीचे व लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर नगर शहरातील एका लॉजमध्ये वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पारनेर तालुक्यातील एका २३ वर्षीय तरुणीच्या फिर्यादीवरून संदेश सुभाष बोरगे (रा. बुरुडगाव, ता. नगर) याच्या विरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारनेर तालुक्यातील एका २३ वर्षीय तरुणीची संदेश सुभाष बोरगे याच्याशी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. त्यानंतर ते दोघे इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात राहू लागले. काही दिवसांनी त्यांनी एकमेकांना मोबाईल नंबर दिले.

मोबाईलवर ते दोघे बोलू लागले. त्यावेळी बोरगे याने तिला तू डीजे ऑपरेटर होऊ शकतेस, असा सल्ला दिला. तसेच त्याने तिला नगरमध्ये क्लास लावून देण्याचे सांगितले. त्यानुसार ती सप्टेंबर २०२३ मध्ये नगर येथे आली असता संदेश याने तिला क्लास लावून दिला.

त्यानंतर ते दोघे रोज भेटू लागले. त्या दरम्यान त्यांच्यात प्रेमाचे संबंध निर्माण झाले. ते एकमेकांना कॅफेमध्ये भेटायचे. त्यावेळी संदेश हा तिला नोकरी लावून देण्याचे आश्वासन द्यायचा. मी डीजे बाँय आहे, तू चिंता करू नकोस. मी तुला नोकरी लावून देईल, असे तो तिला सांगायचा.

तिचा क्लास पूर्ण झाल्यावर तो तिला त्याच्यासोबत कामाला घेवून जाऊ लागला. दोघे काम करत असताना त्याने लग्न करतो असे आमिष दाखवून वेळोवेळी २६ नोव्हेंबरपर्यंत तिला लॉजवर नेऊन शारिरीक संबंध केले. तिने पुन्हा लगाबाबत विचारणा केली असता त्याने तिला धमकी दिली की, तू जर याबद्दल कोणाला सांगितलेस तर मी तुला जिवंत सोडणार नाही.

तसेच तिने त्यास लग्राची विचारणा केली असता त्याने तिला चापटी व चुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी पिडीत तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून संदेश बोरगे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.