Ahilyanagar news : आम्ही अन्न भेसळ प्रतिबंधक अधिकारी आहोत आम्हाला तुमच्या डेअरीच्या दुधाचे नमुने घ्यायचे आहेत, असे सांगून डेअरीतील दुधाचे नमुने घेऊन त्या नमुन्यामध्ये भेसळ असल्याचे सांगत तुमच्यावर गुन्हा दाखल करू. अशी धमकी देऊन श्रीरामपूरसह राहुरी तालुक्यातील अनेक डेअरी चालकांना लाखो रुपयांना गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघा तोतया अधिकाऱ्यांना अटक केली असून त्यातील तिघेजण प्रसार झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, राज्यात अन्न भेसळ प्रतिबंधक पथकाची कारवाई सुरू असल्याचे सांगत तालुक्यातील कारेगाव, निपाणी चडगाव बेलापूर, उक्कलगाव मालुंजे, तसेच राहूरी तालुक्यातील प्रवरा काठवरील गावामध्ये सकाळी साडे आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान दुध संकलन केंद्रांवर तोतया पथकाने घाड टाकली होती, त्यामुळे संकलन केंद्रावर अचानक आलेल्या पथकाला पाहुन केंद्र चालकांमध्ये दुध व्यावसायिकामध्ये खळबळ उडाली.
या अधिकाऱ्यांनी दुध संकलन केंद्रावर दुधाचे नुमने घेत तपासणी करवायची असे सांगितले. यावेळी काही दुध संकलन केंद्रांवरून नुमने चाचणीसाठी नेण्यात आले तसेच कारवाई न करण्यासाठी दुध केंद्र चालकाकडून पैसे उकळल्याचा प्रकार घडला. काही दुध संकलन केंद्र चालकांना हे अधिकारी फक्त पैश्याची मागणी करत होते. काही दूध संकलन केंद्र चालककडून पाच लाखापर्यंत अधिकाऱ्यानी मागणी केली होती.
दरम्यान तालुक्यात याबाबत चर्चा झाल्याने सर्व डेअरी चालकात चांगलीच खळबळ उडाली होती. या तोतया अधिकाऱ्यांनी पोपट विलास जायभाये यांचे ५० हजार, सुमित रमेश पटारे (रा. कारेगाव) यांचेही ६८ हजार रुपये घेतले. या प्रकरणाबाबत चर्चा झाल्याने मालुंजा येथील डेअरी चालक रविंद्र बोरुडे यांनाही याबाबत समजले होते.
अपेक्षेप्रमाणे काल रविंद्र बोरूडे यांच्या डेअरीवर दत्तात्रय वसंतराव साठे व इतर चार अनोळखी इसम यांनी स्वतःची ओळख फूड अँड ड्रग्स ऑफीसर सांगून कारवाईची भीती दाखवून पैशाची मागणी केली. त्यांना संशय आल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.
आता आपल्यावर कारवाई होणार हा संशय आल्याने ते पळून गेले. परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दत्तात्रय वसंतराव साठे, व कासारे (पूर्ण नाव माहीत नाही) व इतर दोन अनोळखी इसम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.