Ahilyanagar News : आपले शरीर जर निरोगी ठेवायचे असेल तर जीवनात खेळाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. खेळामुळे शरीर सुदृढ राहते असे प्रतिपादन शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम यांनी केले .
शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित भव्य क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते . प्रत्येक विद्यार्थ्याने दररोज व्यायाम केला पाहिजे याकडे त्यांनी लक्ष वेधले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना क्रीडाशिक्षक सुभाष पाचकर यांनी स्पर्धा आयोजित करण्यापाठीमागचा उद्देश सांगितला . चां .ता . बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .के.सी. मोहिते यांनी महाविद्यालयातील विविध शैक्षणिक , क्रीडा व इतर सुविधांबाबत माहिती सांगून खेळासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत केले.
यावेळी प्रकाश बाफना म्हणाले की आज विविध प्रकारच्या सुविधा खेळाडूंसाठी उपलब्ध झाले आहे . त्याचा खेळाडूंनी वापर करावा . राजेंद्रजी भटेवरा , शिरीषजी बरमेचा , चंदुलालजी चोरडीया यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या .
या क्रीडा महोत्सवात १४, १७ व १९ वयोगटासाठी धावणे ,लांब उडी, गोळा फेक ,थाळी फेक , कबड्डी व कुस्ती स्पर्धांचे आयोजन केले. या स्पर्धेत ९००खेळाडूंनी सहभाग घेऊन घेतला.
या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी संस्थेचे पदाधिकारी शिरीषकुमार बरमेचा, राजेंद्र भटेवरा ,चंदुलाल चोरडिया, देवदेठणचे प्राचार्य बी. बी.डोके ,शिरूरचे प्राचार्य देवदत्त पाचर्णे , वाडेगव्हाणच्या मुख्याध्यापिका डी.डी.लकडे ,उपप्राचार्य एच.एस. जाधव, क्रीडा विभाग प्रमुख डी. एच. बोबडे तसेच विविध शाळेतील क्रीडा शिक्षक यावेळी उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी शरद दुर्गे, संतोष साळुंके ,राज मारणे यांनी कबड्डी पंच म्हणून काम पाहिले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्पर्धेचे समन्वयक प्रा. योगेश आव्हाड यांनी केले तर आभार सचिन रासकर यांनी मानले.