Maharashtra Havaman Andaj
Maharashtra Havaman Andaj

Maharashtra Havaman Andaj : गेल्या महिन्यात महाराष्ट्रात वादळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली होती. राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला.

काही ठिकाणी गारपीट देखील झाली. मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस झाला. या पावसामुळे रब्बी हंगामातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. अशातच, राज्यातील शेतकऱ्यांची आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे एप्रिल महिन्यात वादळी पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर आता मे महिन्यात देखील मान्सूनपूर्व पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे.

खरे तर वादळी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक भागांमधील तापमान वाढले. राज्यातील उत्तर महाराष्ट्रातील मालेगावात तब्बल 44° c पर्यंतच्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

मालेगावसह राज्यातील इतरही अनेक भागांमध्ये तापमानाने नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात देखील तापमानात मोठी वाढ नमूद केली जात आहे.

मात्र आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज हवामान खात्याने जारी केला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या चार पाच दिवसात वातावरणात अनेक मोठे बदल पहायला मिळण्याची शक्यता आहे.

राज्यात अनेक ठिकाणी उष्ण आणि दमट वातारवरण पाहायला मिळू शकत. तर, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वार वाहणार आहे. तसेच काही ठिकाणी तुफान पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याचा माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे.

मराठवाड्यात पुढील चार ते पाच दिवस वादळी वा-यासह पाऊस हजेरी लावणार असा अंदाज देण्यात आला आहे. मराठवाड्यातील एक किंवा दोन जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

तर, काही ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. या काळात 40 किमी प्रतितास वेगानं सोसाट्याचा वारा वाहणार असे बोलले जात आहे.

कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहणार असे म्हटले जात आहे. यामुळे मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांना विशेष सावध राहण्याचा सल्ला यावेळी तज्ञ लोकांच्या माध्यमातून दिला जात आहे.