Ahilyanagar News : सध्या शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यात चांगलाच वाद पेटला आहे. एकीकडे मराठवाड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाहनावर सुपाऱ्या फेकण्याचे आंदोलन केले होते. हे सुपारी फेकण्याचे आंदोलन ठाकरे गटाकडून करण्यात आल्याचा दावा करत मनसेकडून देखील त्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले.

ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर मनसेने नाराळ, शेण, बांगड्या आणि टोमॅटो यांचा मारा करण्यात आला. यानंतर आता हा वाद आणखी वाढला असून आता या वादाचे लोन अहिल्यानगरमध्ये देखील पोहचले आहे. जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सध्या सुपारी बाज असे मोठे पोस्टर झळकत आहेत. त्यामुळे या पोस्टरवरून अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यावेळी त्यांच्या ताफ्यावर अज्ञात कार्यकर्त्यानी सुपारीचा मारा केला होता. दरम्यान हा मारा ठाकरे गटाकडून करण्यात आल्याचा दावा करत मनसेकडून त्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले.

ठाण्यात आयोजित एका कार्यक्रमास जात असताना उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर मनसेने नाराळ, शेण, बांगड्या आणि टोमॅटो यांचा मारा केला, यानंतर आता हा वाद आणखी चिघळला असून आता या ठाकरे बंधुंच्या वादाचे थेट अहिल्यानगरमध्ये उमटले असून त्याची परिणीती म्हणून कर्जत तालुक्यात सुपारीबाज असे पोस्टर झळकत आहेत.

पुढील काही महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. मात्र सध्या राज्यात मराठा समाजाचे आरक्षणासाठी सुरु असलेले आंदोलन त्यापाठोपाठ ओबीसी समाजाचे देखील आंदोलन सुरु आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून राज्यातील वातावरण प्रचंड ढवळून निघाले आहे.

त्यातच विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. आगामी विधानसभेसाठी मनसे नेते राज ठाकरे यांनी देखील राज्यभर दौरे सुरु केले आहेत. मात्र त्यांचे दौऱ्यामुळे वातावरण चांगलेच तापत आहे. ते मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी मराठा समाजाला आरक्षणाची गरज नसल्याची भूमिका मांडल्यामुळे या या भागात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. आता सुपारीबाज हे प्रकरण चर्चेत आले आहे. मात्र हा फलक कोणी लावला याबाबत अद्याप काहीच माहिती मिळत नाही.

काय आहे या फलकात.. 

कर्जत येथील मेन रोडवर सुपारीबाज असा काळ्या रंगाचा फलक लावण्यात आला आहे. यावर सुपारी आणि बाज यांचे चित्र लावण्यात आले आहे. त्यामुळे ठाकरे गटाचा संघर्ष आता जिल्ह्यामध्ये पोहोचला असून या गाजत असलेल्या भल्या मोठ्या फलकावर ‘लवकरच घेऊन येत आहेत, पुढील अपडेट १६ ऑगस्ट या दिवशी’ असे लिहिले आहे. मात्र हे पोस्टर कोणी लावले आहे त्याचे नाव लिहिण्यात आलेले नाही. त्यामुळे हा फलक कोणी लावले याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. दरम्यान या फलकावरून राजकीय वर्तुळामध्ये आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.